Share

वामिकाचे फोटो व्हायरल झाल्याने विराट-अनुष्का त्रस्त; पोस्ट शेअर करत म्हणाले, आम्ही विनंती…

Virat Kohli And Anushka Sharma

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिका (Virat Kohli And Anushka Sharma )कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावर विराट आणि अनुष्काने सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट आणि अनुष्का नेहमीच आपली मुलगी वामिकाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांनी फोटो काढू नये तसंच प्रसिद्ध करु नयेत, यासाठी विनंतीही केली. मात्र दक्षिण आफ्रिकासोबतच्या सामनादरम्यान पहिल्यांदाच वामिकाचा चेहरा सर्वांसमोर आला.

सामन्यादरम्यान जेव्हा भारताकडून फलंदाजी सुरु होती तेव्हा विराट फलंदाजी करत होता. तेव्हा अनुष्का तिची मुलगी वामिकाला कडेवर घेऊन विराटला चीयर्स करत होती. त्याचदरम्यान कॅमेऱ्याची नजर अनुष्का आणि वामिकाकडे वळाली आणि वामिकाचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला. वामिकाचा हा फोटो समोर येताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडिया आणि इत्यादी गोष्टींची समज येत नाही तोवर तिला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा मानस विराट कोहली आणि अनुष्का यांनी याआधीच बोलून दाखवला होता. पण आता त्यांच्या मुलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर या दोघांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलीचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर न करण्याची विनंती केली आहे.

दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्हाला समजलं की, स्टेडियममध्ये आमच्या मुलीचे फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. त्यानंतर ते फोटो मोठ्या प्रमाणात शेअरही करण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे आमच्यासाठी खूपच हैराण करणारी गोष्ट आहे. तसेच आम्हाला माहितच नव्हते की, कॅमेऱ्याची नजर आमच्यावर होती’.

पुढे त्यांनी लिहिले की, ‘आताही आम्ही त्याच भूमिकेवर ठाम असून आधीप्रमाणे आताही विनंती करत आहेत. तसेच वामिकाचे फोटो काढले किंवा प्रसारित केले नसेल, तर त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद’. दरम्यान, अनुष्का आणि विराटची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: श्रेयस तळपदेची एअरपोर्टवर धाकड एन्ट्री; म्हणाला, ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?’
‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..
CID मधील ACP प्रद्युमन यांना मिळेना काम; म्हणाले, हे माझं दुर्भाग्य आहे की मी घरी बसून..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now