Share

Virat kohli : जसं मला कळालं, वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये आहे तसं मी.., विराटने खोललं आपल्या कमबॅकचं रहस्य

Virat kohli | भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची बॅट 2022 च्या T20 विश्वचषकात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध करिष्माई खेळी खेळण्यापासून ते बांगलादेशच्या गोलंदाजांना नाकी नऊ आणण्यापर्यंत विराट प्रत्येक फॉर्ममध्ये त्याच्या वाईट काळातून बाहेर आला आहे.

बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात त्याने झळकावलेल्या अर्धशतकासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यानंतर त्याने आपल्या खेळीबाबत वक्तव्य केले आहे. प्रदीर्घ काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या विराट कोहलीने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 3 अर्धशतके झळकावली आहेत.

आपल्या जुन्या शैलीत परतत त्याने बांगलादेशविरुद्ध 44 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे. अशा स्थितीत सामन्यानंतर बोलताना त्याने पुनरागमनाबद्दल चर्चा केली. विराट म्हणतो की, जेव्हा त्याला समजले की विश्वचषक ऑस्ट्रेलियात आहे, तेव्हा तो आतून हसत होता.

हा खुप अटीतटीचा सामना होता. आम्हाला हा इतक्या अटीतटीचा सामना बनवायचा नव्हता. माझा आजचा दिवस चांगला गेला. तरी थोडं दडपण होतं. मी सध्या एका आनंदी ठिकाणी आहे आणि याची तुलना मला माझ्या भुतकाळाशी करायची नाही. विश्वचषक ऑस्ट्रेलियात आहे हे कळताच मी आतून खुप आनंदी झालो होतो.

पुढे विराट म्हणाला की, मी येथे चांगले क्रिकेटचे शॉट्स खेळू शकतो. हा माझ्यासाठी फक्त एक विस्तार आहे. मला या मैदानावर खेळायला आवडते. हे मला घरासारखे वाटते. जेव्हा मी ऍडलेडला येतो, तेव्हा मी स्वतःचा आनंद घेण्यासाठी आणि फलंदाजी करत राहण्यासाठी येथे आलेलो असतो.

सामन्याबाबत बोलायचे झाले तर तर टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 टप्प्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होता. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जेथे केएल राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांमुळे भारताने 184 धावा करता आल्या.

बांगलादेशला 185 धावांचे लक्ष्य मिळाले, जे सामन्यात पावसामुळे 16 षटकात 151 धावांवर आले. लिटन दासच्या स्फोटक सुरुवातीशिवाय एकाही फलंदाजाला प्रभावी खेळी करता आली नाही, त्यामुळे बांगलादेश संघ केवळ 145 धावाच करू शकला आणि भारताने 5 धावांनी विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या
अर्शदीपची घातक गोलंदाजी पाहून चाहते हैराण, म्हणाले, भारत सरकारला विनंती आहे की..
T-20 World Cup : भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानचा रडीचा डाव; समीकरण बदलणार?
Dinesh Karthik : स्टंपला चेंडू लागला नाही तरी थर्ड अंपायरने कार्तिकला दिलं धावबाद; चाहते संतापले म्हणाले…
India : बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारतासाठी आली आणखी एक मोठी गुड न्यूज; वाचून खुश व्हाल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now