Share

लाडक्या लेकीचा फोटो व्हायरल झाल्यावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया; कळकळीची विनंती करत म्हणाला,…

Virat Kohli And Anushka Sharma

सोशल मीडियावर सध्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका (vamika) यांचा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच अनुष्का आणि विराटने माध्यमांना विनंती केली होती की वामिकाचा फोटो कोणीही घेऊ नये. ते दोघेही तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नव्हते. सोशल मीडिया आणि कॅमेऱ्यांपासून इतके दिवस वामिकाला हे दोघेही दूर ठेवत होते. (virat kohli anushka sharma daughter vamika photo viral virats reaction)

मात्र एका सामन्याच्या दरम्यान वामिकाचा फोटो घेण्यात आला. तो आता व्हायरल होत आहे. यावरच आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराट कोहली म्हणतो, “आम्हाला कळालं आहे की काल मैदानावर आमच्या मुलीचा फोटो घेण्यात आला आणि तो वेगाने व्हायरल होत आहे.”

“आम्हाला सांगायचं आहे की आमचं त्यावेळी लक्ष नव्हतं आणि कॅमेरा आमच्याकडे आहे याची आम्हाला जाणीव नव्हती. यावर आमची भूमिका आणि विनंती आधीप्रमाणेच असेल. वामिकाचे फोटो कोणीही घेऊ नये, प्रसिद्ध करू नये. त्यासाठीची कारणं आम्ही यापूर्वीही दिली आहेत,” असे विराटने सांगितले आहे.

दरम्यान, जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडिया आणि इत्यादी गोष्टींची समज येत नाही तोवर तिला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा मानस विराट कोहली आणि अनुष्का यांनी याआधीच बोलून दाखवला होता. त्याबाबत दोघं वारंवार खूप काळजी देखील घेत असल्याचं दिसून येतं.

आपल्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींची समज वामिकाला आली आणि ती तिचे निर्णय घेण्यास सक्षम झाल्यानंतर आम्ही तिला अडवणार नाही”, असंही कोहली म्हणाला होता. गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या वामिकाला अनुष्काने कडेवर घेतलं होतं. यानिमित्ताने विराट कोहलीची पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीची मुलगी तिला मम्मा म्हणताना दिसली होती. अनुष्का शर्माने न्यू इयर पार्टी सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यातील एक व्हिडिओ असा आहे ज्यामध्ये वामिका तिला आई म्हणताना दिसली होती. व्हिडिओमध्ये वामिका कुठेही दिसत नसली तरी तिचा आवाज स्पष्ट ऐकू आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
देशातील पहिलेच असे गाव जिथे लोकांना कधीच पडत नाही स्टोव्ह किंवा एलपीजी गॅसची गरज, वाचा यामागचे कारण
राष्ट्रगीत चालू असताना विराटने केले लज्जास्पद कृत्य; चाहते म्हणाले, ‘तु पाकिस्तानात जा’, पहा व्हिडीओ
‘ताई उठ ना गं…डोळे उघड, बघ तुझा दादा आहे मी’; महिन्यावर लग्न आलेल्या बहिणीचा भावासमोरच तडफडून गेला जीव
VIDEO: श्रेयस तळपदेची एअरपोर्टवर धाकड एन्ट्री; म्हणाला, ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?’

आंतरराष्ट्रीय इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now