Virat Kohli: भारतीय संघात निवड न झाल्याने रात्रभर रडत बसला होता विराट, किस्सा वाचून भावूक व्हाल

Virat Kohli: विराट कोहली (Virat Kohli) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 18 ऑगस्ट 2008 रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला. टीम इंडियामध्ये येण्यापूर्वी कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता. आज विराट कोहली हे एक मोठे नाव बनले आहे. हे नाव करण्यासाठी कोहलीला खूप संघर्ष करावा लागला आहे. यामध्ये त्यानी एका संघर्षाबद्दल सांगितले आहे. Virat Kohli, Birthday, International Cricket, Coach, Debut

वृत्तानुसार, आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना विराट कोहली म्हणाला, पहिल्यांदा माझी राज्य संघात निवड झाली नाही, तेव्हा मी खूप निराश झालो होतो आणि रात्रीचे जवळपास 3 वाजेपर्यंत रडलो होतो. माझा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की, मला नाकारण्यात आले आहे. कोहलीने 2006 साली दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

याबद्दल बोलताना कोहली पुढे म्हणाला, मी सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, सर्व काही चांगले होते. माझ्या कामगिरीवरही सर्वजण खूश होते. यानंतरही मला नाकारण्यात आले. याबद्दल मी माझ्या प्रशिक्षकाशी सुमारे 2 तास बोललो. आजपर्यंत मला याबद्दल काहीही समजले नाही. माझा विश्वास आहे की जिथे संयम आणि समर्पण असते तिथे प्रोत्साहन मिळते आणि यश मिळते.

विराट कोहलीने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 102 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 49.53 च्या सरासरीने 8074 धावा केल्या आहेत. याशिवाय कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 262 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 57.68 च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत.

त्याचवेळी 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने 53.13 च्या सरासरीने 3932 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 71 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 27, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1 शतके झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : विराट कोहलीच्या धडाकेबाज कामगिरीत पांड्याचाही होता वाटा? सामन्यानंतर विराट म्हणाला…
Virat Kohli : विराट कोहलीची एक चूक पडली महागात; भारतीय संघाला गमवावा लागला सामना
Virat Kohli: विराट कोहलीवर गंभीर आरोप, बांगलादेशविरोधात केली फेक फिल्डींग, पंचांनी दुर्लक्ष केलं नाहीतर..