आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सोशल मीडियावर क्रिकेटपटूंविषयी, संघाविषयी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये खास करुन विराट कोहलीवर मिम्स आणि व्हिडीओ बनताना दिसत आहेत. नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
एका युट्युब चॅनेलने केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. या व्हिडीओत एका कामवाल्याबाईची भूमिका मुलीने साकारली आहे. ती ग्राउंडमध्ये मॅच बघत असताना आपल्या मालकीणीला म्हणते की, मी अगोदर सचिन तेंडुलकरच्या घरी कामाला होते.
इतकेच नव्हे तर, मी विराट कोहलीकडेही कामाला होते. हे ऐकून मालकीणीचा नवरा म्हणतो की बघ विराट पुढेच बसला आहे त्याला आवाज दे. त्यावरुन ती कामवाली विराटला चिकू म्हणून आवाज देते. आवाज ऐकताच विराट येऊन आवाज कोणी दिल्याचे विचारतो.
यावर मालकीण मोलकरणीचे नाव घेई पर्यंतच ती अनुष्का भाभी म्हणून ओरडले. त्यामुळे लगेच सर्वजण मागे पाहतात. इकडे मोलकरीण गायब होऊन जाते. या व्हिडीओला शॉर्ट ब्रेकने शेअर केले आहे. यातील कलाकारांनी साकारलेली भूमिका नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. विराट आणि अनुष्काच्या फॅनने व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.
सध्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. तर विरोधी संघाविषयी नेटकरी तुफान जोक्स शेअर करत आहेत. यासगळ्याचा आनंद नेटकरी लुटताना दिसत आहेत. सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी सर्वच संघ पूर्ण प्रयत्न करत आहेत. यात कोण बाजी मारत आहे तर कोणाला पराभव सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
“सोमय्यांनी कोर्टात स्वताच चोरी मान्य केली, त्यामुळे आता त्यांना कधीही अटक होऊ शकते”
कोट्यवधींची मालकीन असणाऱ्या समंथाकडे एकेकाळी शिक्षणासाठी नव्हते पैसे; ‘हे’ काम करून झाली टॉलिवूडची स्टार
राज ठाकरेंनी मराठी मुद्द्यावरून यु-टर्न घेतलाय का? ठाण्यातील ‘त्या’ बँनरची चर्चा
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं