Share

Viral video: …अन् चेस खेळताना रोबोटने तोडली चिमुकल्याची बोटं, व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Viral video | दोन आठवड्यांपूर्वी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बुध्दिबळाची स्पर्धा सुरु होती. बदलत्या काळानुसार आता यंत्राशीसुद्धा गेम खेळता येऊ शकतो. त्यामुळे ही स्पर्धा रोबोटशी खेळायची होती. ७ वर्षीय मुलगा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. स्पर्धा सुरु असताना रोबोट आपला डाव खेळला.

लगेच मुलाने हालचाल केली व सोंगटीला हात लावला. त्याच क्षणी रोबोटने मुलाचे बोट धरून ठेवले. हा प्रकार पाहून सर्वत्र खळबळ उडाली. मुलाच्या मदतीसाठी ४ जण पुढे आले आणि मुलाचे बोट सोडविले. या घटनेचा व्हिडीओ पाहताच अंगावर शहारे येतात. अनेकांना गेम खेळायची आवड असते.

प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार गेम खेळत असतात. पण काही गेम जिवाशी येतात. बुद्धिबळ या खेळात शारीरिक दुखापत होत नाही कारण हा गेम जागेवर बसूनच खेळला जातो. १९ जुलै रोजी हा प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यातून कळते की, रोबोटने पहिल्यांदा मुलाच्या सोंगटीला बाहेर फेकले.

नंतर मुलाने हालचाल केली आणि लगेच रोबोटने मुलाचे बोट पकडले. त्यांनतर उपस्थित लोकांनी रोबोटच्या पकडीतून मुलाचे बोट सोडवले. दोन व्यक्ती खेळासाठी आमनेसामने बसतात. त्याचप्रमाणे यावेळी रोबोट बसलेला होता, त्यामुळं धोका निर्माण झाला. यंत्राशी गेम खेळताना नियमावली जाणून घेणे फार महत्वाचे ठरते. कोणताही गेम खेळताना सावधगिरी बाळगायला हवी.

‘मॉस्को’ चेस फेडरेशनच्या अध्यक्षा ‘सर्गेई लाजरेव’ सांगतात की, अपघात घडला हे खूप वाईट झाले. याआधी सुद्धा भरपूर वेळा रोबोटशी गेम खेळला पण असे घडले नाही. डाव खेळल्यानंतर रोबोटला थोडा वेळ द्यावा लागतो. मुलाने घाई केली व दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मुलगा दुसऱ्या दिवशी गेम खेळायला सक्षम होता. या सर्व प्रकारामुळे सर्वत्र रोबोटबाबत भीती निर्माण झाल्याचे दिसून येते. कोणत्याही यंत्राचा वापर करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे ठरते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या
Eknath shinde: शिंदे गटाने रुग्णवाहिका परत घेतली, संतापलेल्या शिवसैनिकांनी नवीकोरी रुग्णवाहिका केली भेट
सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न भंगणार; किंमतीमधील वाढ पाहून डोळे पांढरे होतील
हाच तो महाराष्ट्र बाणा, हाच तो ठाकरी बाणा; कठीण परिस्थितीशी लढायला आनंद दिघेंचा पुतण्या ठाकरेंसोबत
आंबेडकरी चळवळीची वाघीन आता ठाकरेंच्या मदतीला; पुण्यात शिवसेनेची ताकद वाढणार

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now