प्रेम हे आंधळ असतं असं आपण म्हणतो. प्रेमात अनेक जण आपल्या सीमारेषा ओलंडतात. त्यातूनच अनेकदा अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतीलच. प्रेम म्हणलं की गप्पा, एकत्र फिरणे, भेटी हे हळूहळू वाढतच हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही.
अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला यायचा. गाठभेट, गप्पागोष्टी व्हायच्या असे तब्बल 4 महिने सुरू होते. मात्र पुढे झालं असं की, एकेदिवशी तो आपल्या प्रेयसीला भेटायला आला. मात्र तिथच त्याला प्रेयसीच्या घरच्यांनी पकडले.
तर वाचा पुढं नेमकं घडलं काय? ही घटना आहे बिहारमधील. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर गावात घडल्याच समोर आले आहे. अमरजीत कुमार असे या तरुणाचे नाव आहे. तो दीपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीरामनगर येथे प्रेयसीला गुपचूप भेटायला यायचा.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या परिसरातील तरुणीसोबत त्याचे चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. 4 महिन्यात अनेकदा तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिथ येत असे. नेहमीप्रमाणे सोमावरी दुपारी अमरजीत हा प्रेयसीच्या घरी नातेवाईकांच्या अनुपस्थितीत तिला भेटण्यासाठी आला होता.
मात्र पुढं काही विचित्रच घडलं. अमरजीत घरी आल्याची माहिती प्रेयसीच्या कुटुंबीयांना मिळाली. कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला पकडण्यासाठी प्लॅन तयार केला. आणि त्याला तिथच पकडले. मात्र प्रियकराला कुटुंबीयांनी बोट देखील लावले नाही. जाबही विचारला नाही.
थेट त्या दोघांचे मंदिरात लग्न लावून दिले. लगेच जाऊन नातेवाईकांनी बाजारातून लग्नाचे कपडे आणले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, कुटुंबीय आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने गावातीलच मंदिरात या प्रेमीयुगुलांचा विवाह झाला. सध्या या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.