Share

हिंसक आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेची नोकरी मिळणार नाही, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

bihar railway strike

आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थी बिहारमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करत आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या उमेदवारांच्या या आंदोलनाला काल उग्र वळण लागले.(Violent agitating candidates will not get railway jobs, big decision of railway administration)

आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात त्रुटी असल्याचा आरोप करत हजारो विद्यार्थ्यांनी बिहारमधील काही रेल्वे स्टेशनवर चक्का जाम आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाने मात्र परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप फेटाळला आहे. यामुळे बिहारमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. सध्या तरी रेल्वे मंत्रालयाने नोटीस बजावून आंदोलन करणाऱ्या नाराज उमेदवारांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने आज जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, रेल्वेची परीक्षा देणारे विद्यार्थी रेल्वे रुळांवर आंदोलने करणे, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील आहेत. विद्यार्थ्यांकडून झालेले हे कृत्य ही अनुशासनाची सर्वोच्च पातळी आहे. यामुळे असे उमेदवार रेल्वे अथवा सरकारी नोकऱ्यांसाठी अयोग्य ठरतात.

या नोटीसमध्ये पुढे म्हंटले आहे की, विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाचे संबंधित व्हिडिओ तपासले जातील. यानंतर या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग घेणाऱ्या उमेदवारांवर पोलिस कारवाई केली जाईल. तसेच या उमेदवारांना रेल्वेची नोकरी मिळण्यास आजीवन बंदी घातली जाऊ शकते. या उमेदवारांना रेल्वे किंवा सरकारी विभागाची कोणतीही परीक्षा देता येणार नाही.

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) न्याय्य आणि पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहे. रेल्वे नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये किंवा अशा घटकांच्या प्रभावाखाली जाऊ नये. काही लोक त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी तुमचा वापर करू पाहत आहेत, असे देखील या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बिहारमधील बक्सर, मुझफ्फरपूर, नवादा, सीतामढी, आराम आणि नालंदा या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जाम केला होता. या ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांची पोलिसांशी झटापट देखील झाली होती. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. या कारणांमुळे रेल्वे प्रशासनाने उमेदवारांना नोटीस बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीच येणार; तांत्रिकानं केली मोठी भविष्यवाणी..
महत्वाची माहिती: कोरोना आणि सर्दीच्या लक्षणांवर प्रभावी आहेत या ६ स्वस्त गोळ्या, नेहमी ठेवा घरात
छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा भडकली; म्हणाली, सलमानने मला मोठं नाही केलं, जर माझं कनेक्शन..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now