Share

Vinod Kambli : विनोद कांबळीवर आलेत हलाखीचे दिवस; म्हणाला, सचिनला सगळं माहित आहे पण माझी..

vinod kambali and sachin t

Vinod Kambli: एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारा आणि सचिनच्या साथीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा क्रिकेटपटू विनोद कांबळी याची आज अवस्था वाईट आहे. बेशिस्त आणि वाद या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २००० सालीच संपुष्टात आली. त्यानंतर आता त्याच्यासमोर अर्थार्जनाचा मोठा प्रश्न उभा राहिल्याचे वृत्त समोर येत आहे.

विनोद कांबळी याचे घर सध्या बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निवृत्तिवेतनावर चालू आहे. कोरोनाकाळात नेरूळ येथील तेंडूलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमधील मार्गदर्शनाचे त्याचे काम स्थगित झाले आहे. त्याप्रमाणे २०१९ मध्ये झालेल्या मुंबई क्रिकेट लीगमध्ये तो एका संघाचा प्रशिक्षक होता.

आता ती लीग पण अजुन सुरु झालेली नाही. त्यामुळे विनोद कांबळीसमोर अर्थार्जन करण्याचे पर्याय नाहीत. अशा परिस्थितीमध्ये विनोद कांबळीने मुंबई क्रिकेट संघटनेला प्रशिक्षक म्हणून मला घ्यावे, अशी विनंती केली आहे.

विनोद कांबळी अनेक वादांमुळे चर्चेत राहिला होता. पण त्याने अनेक आठवणीत राहणारे विक्रम देखील केले आहेत. १९९३ ला विनोद कांबळीने सलग २ द्विशतके झळकावत क्रिकेट जगतात दणक्यात प्रवेश करण्याची ग्वाही दिली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने शतके झळकावली. त्यातील ३ प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध सलग ३ शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीने १९८८ मध्ये एका सामन्यात ६६४ रनांची भागीदारी करून क्रिकेट विश्वात मोठा विक्रम नोंदवला होता. विनोद कांबळीने त्याची कारकीर्द चांगलीच गाजवली होती. मात्र आता त्याच्यावर हलाखीचे दिवस आले आहेत.

बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजार रुपयांच्या निवृत्तिवेतनावर सध्या त्याच्या घराचा उदरनिर्वाह होत आहे. त्यामुळे मुंबईच्या क्रिकेट संघटनेकडे त्याने कामाची मागणी केली आहे. ज्यामुळे तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट करू शकेल. सचिनला सगळं माहित आहे. तो कायम माझ्यामागे खंबीरपणे उभा असतो. त्याच्याकडून माझी कोणती अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया त्याने दरम्यानच्या काळात दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Diya Aur Baati Hum: ‘दिया और बाती हम’ अभिनेत्रीने स्वतःशीच केले लग्न; म्हणाली, ‘मला पुरुषांची गरज नाही, कारण मी…’
Arjun Kapoor: बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर संतापला, म्हणाला, लोकांना धडा शिकवणे गरजेचे कारण..
घरात शांतता हवी असेल तर, पत्नी पतीला घराबाहेर काढू शकते; न्यायालयाचा मोठा निर्णय

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now