Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत उडी घेतली आहे. बीसीसीआयच्या नवीन निवड समितीमधील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर रोजी संपली आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवे निवडकर्ते मिळणार आहेत.
नुकतेच बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला बरखास्त केले होते. विनोद कांबळीने निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत उडी घेतली. यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या नवीन निवडकर्त्यांसाठी अर्ज मागवले होते.
सलील अंकोला, समीर दिघे आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी निवड समितीच्या पदांसाठी अर्ज केले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अजित आगरकरांबाबत दुविधा. मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकरने अर्ज केल्यास तो मुख्य निवडकर्ता होण्याची खात्री आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, याशिवाय माजी फिरकीपटू मनिंदर सिंग, माजी सलामीवीर शिव सुंदर दास यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या वरिष्ठ निवडकर्त्यांच्या पदांसाठी अर्ज केले आहेत. नावे समाविष्ट आहेत.
मुख्य निवडकर्ता होण्यासाठी आवश्यक गोष्टी. टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता होण्यासाठी, या पदासाठीच्या उमेदवाराला किमान 7 किंवा अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असावा.
उमेदवाराला 30 प्रथम श्रेणी सामने, 10 एकदिवसीय सामने किंवा 20 लिस्ट-ए सामन्यांचा अनुभव असावा. मुख्य निवडकर्ता पदासाठीच्या उमेदवाराने क्रिकेटमधून निवृत्तीची ५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
महत्वाच्या बातम्या
Sanju Samson : टिम इंडीयात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनचा फिफा वर्ल्डकपमध्ये जलवा; वाचा कतारमध्ये नेमकं काय घडलं…
Hemlata Jakhar : बहीण बनली अधिकारी, भावांनी तिला खांद्यावर बसवून गावभर मिरवणूक काढली; जाणून घ्या हेमलताच्या संघर्षाची कहाणी
Suryakumar Yadav : पावसात मैदान साफ करणाऱ्यांची मदत करताना दिसला सूर्या; व्हायरल व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मने