एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. यादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.(vinayak raut statement about eknath shinde)
“कुणी तरी लिहून द्यायचे आणि त्यांनी ट्विट करायचे हे आम्हाला माहित नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या हाताने ट्विट तरी करता येते का?”, असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, “आम्हाला निवडणूक आयोगाला आमची निष्ठा दाखवायची आहे. म्हणून आम्ही प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहोत. आज तरी गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. उद्या जनमाणसाचा विचार करू. शिंदे यांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करावं लागेल.”
“कुणी तरी लिहून द्यायचे आणि त्यांनी ट्विट करायचे हे आम्हाला माहित नाही का? त्यांना स्वतःच्या हाताने ट्विट तरी करता येते का? मला त्यांच्या विद्वतेचा अभ्यास करावा लागेल”, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
“शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यात आली आहे. काही जण आपलं मंत्रीपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तुम्ही कुठेही जा ,आम्ही सेनेत राहणार आहोत, असं काही शिवसैनिकांनी उदय सामंत यांना त्यांच्या घरी जाऊन सांगितले”, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“शिवसैनिकांची ताकद आम्ही पुन्हा एकदा दाखवून देऊ. तुम्ही आमदार विकत घ्याल. पण तुम्हाला शिवसैनिक विकत घेता येणार नाही”, असे देखील शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रत्नागिरीमध्ये १० जुलैला शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या निर्धार मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली अन्.., प्रवीण दरेकरांचा आरोप
शिवसेनेचा ढाण्या वाघ राबतोय शेतात, अधिवेशनानंतर भास्कर जाधवांचा शेती करतानाचा फोटो व्हायरल
सरल वास्तुचे संस्थापक चंद्रशेखर गुरूंजीच्या हत्येचे फुटेज आले समोर, धक्कादायक माहिती उघड