Share

”भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, आधी गणित समजून घ्या मग बोला”

devendra fadanvis

गुरुवारी राज्य सरकारने वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. (vinayak raut reply to opposition wine sells in grocery stores maharashtra)

मात्र, या निर्णयाला भाजपाकडून प्रचंड विरोध करण्यात येत आहे. यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते तथा शिवसेना खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असल्याचा आरोप केला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं. भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

तसेच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. पवार म्हणाले, वाईन आणि दारू त्याच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्षातून, काजूतून वाईन तयार केली जाते.

यासोबतच अनेक वेगवेगळ्या फळातून वाइन तयार केली जाते. आपल्याकडे जेवढी वाईन तयार होते तेवढी वाईन खपत नाही. आजूबाजूच्या राज्यात त्याची विक्री केली जाते. काही परदेशात एक्सपोर्ट केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाइन्स पितात हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु काही जाणीवपूर्वक त्याला मद्यराष्ट्र म्हणत वेगळेच महत्त्व दिले, असे पवार म्हणाले.

तर दुसरीकडे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘वाईनला परवानगी देण्याचा निर्णय हा संतापजनक,’ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. तसेच सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे म्हणाले.

दरम्यान, ‘महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचेही भिडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
मुलीचा आणि जावयाचा घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांतची आहे ‘ही’ इच्छा, त्यासाठी करत आहेत प्रयत्न
पद्मश्री नाकारणाऱ्या प्रसिद्ध गायिकेची प्रकृती ढासळली, रुग्णालयात करावे लागले दाखल
चालत्या ट्रेनमध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांना करावी लागली होती अंघोळ, त्यामागे होते हे मोठे कारण
..त्यावेळी रवीना टंडनने फराह खानला खुल्लेआम दिली होती धमकी, कारण वाचून अवाक व्हाल

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now