politics : शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकीच एक म्हणजे नारायण राणे. त्यांनी माध्यमांसमोर येत उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. ‘उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवतीर्थावर फक्त तमाशा केला. साहेबांनी नाव मोठं केलं. पण या माणसाची तेवढी पात्रता नाही,’ अशा या शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर खरमरी टीका केली. त्याचाच समाचार शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी घेतला.
ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत शिवसैनिकांशी संवाद साधताना विनायक राऊत यांनी ‘कोंबडीचोर’ असा शब्द वापरत नारायण राणेंवर प्रहार केला. ते म्हणाले, ‘या महाराष्ट्रात कर्मवीर झाले, प्रबोधनकार झाले, त्याच लोकांनी कोंबडीचोर अशी पदवी दिली. तीही बिन पैशाची,’ असे म्हणत राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले.
ते पुढे बोलताना म्हणाले, ‘उद्धव ठाकरे ६ वर्षाचे असताना शिवसेनेची स्थापना झाली. त्या सहा वर्षामध्ये मिळालेल्या संस्कारातून त्यांनी शिवसेना उभी केली. शिवसेनेची स्थापना होत असताना तु काय कोंबडीची पीस उपटत होता काय ?, तुझी उंची किती, डोकं केवढं.. असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला.
‘दोनदा विधानसभेत तुझा आपटी बार केला. त्यानंतर लोकसभेतही तुला धूळ चारली,’ असे म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या पराभवाचा पाढाच ठाण्यातील या संवादा दरम्यान वाचला. याच विनायक राऊत यांनी ठाण्यातील या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर पण सडकून टीका केली.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. ‘उद्धव ठाकरे हे करतात काय? त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून?’ असे प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले होते. माध्यमांसमोर ते म्हटले होते की, ‘शिवसेना तळागळात पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे आणि नारायण राणेने केलं आहे. पण हा आयत्या बिळावर नागोबा आहे.’ नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या याच प्रखर टीकेला कडव्या शब्दात विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट होते.
नारायण राणे कायमच उद्धव ठाकरे आणि पक्षावर गंभीर टीका करत असतात. मात्र याच टीकेला शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर दिले जाते. कधीकाळी शिवसेनेत असणारे नारायण राणे पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मग स्वतःचा पक्ष आणि आता भाजप असा मोठा राजकीय प्रवास केला आहे. याच नारायण राणेंवर दसरा मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कडाडून टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या-
Ajay Devgn: कैथीच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगणला पाहून साऊथ अभिनेता म्हणाला, अनेकांनी मला फोन करून…
Rekha : ..त्यावेळी ढसाढसा रडत असताना अनवाणी पायांनी रस्त्यावरून पळत सुटली होती रेखा, वाचा किस्सा
Vinayak Raut : २००३ मध्ये आम्ही बाळासाहेबांना डावलून..; विनायक राऊतांनी जाहीर सभेत कबुल केली चूक