शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त झाली. आता मात्र या संदर्भात राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी वेगळ्याच प्रकारची मागणी सरकारकडे केल्याची बाब समोर येत आहे. (Vinayak Mete’s wife should be given MLA opportunity from Governor’s quota)
विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. भाजपच्या जवळचा असणाऱ्या शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सरकारकडे केली आहे.
विनायक मेटे गेल्याने शिवसंग्राम पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच मराठा आंदोलनाचा आवाज राज्यातून हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या पत्नीला योग्य तो सन्मान भाजपकडून मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.
मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी आक्रमक भूमिका मांडणाऱ्या विनायक मेटे यांचा अपघात झाला. त्याच दिवशी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार होती. मात्र बीडवरून मुंबईच्या दिशेने येत असतानाच खोपोली जवळील बोगद्यात त्यांचा मोठा अपघात झाला.
या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. विनायक मेटे यांच्या जाण्याने मेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांच्या पत्नी व घरच्यांची भाजपने दाखल द्यावी. तसेच राज्यपाल कोट्यातून ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या काकडेंकडून होत आहे.
राजकारणात असले तरीही शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे इतर पक्षांतील नेत्यांशी मैत्रीपूर्वक संबंध होते. त्यांच्या जाण्याने मराठा आरक्षणासंदर्भात खंबीरपणे भूमिका मांडणारा नेता हरवल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
(Monsoon sessions): आले रे आले गद्दार आले, ५० खोके घेऊन ओक्के झालेले आले; शिंदे गटातील आमदारांचा सर्वांसमोर पाणउतारा
Eknath Shinde : अधिवेशन काळात ‘या’ मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गट येणार अडचणीत; सरकारचीही सत्वपरीक्षा
भाजपला शिंदे गटाची गरज नाही?, प्लॅन बी वर काम सुरू; राजकीय वर्तूळात खळबळ