मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. राज्यभरातून या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांनी सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न लावून धरले होते. आता मराठा समाजाच्या नेत्यांनाच त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका असल्याचे समोर येत आहे. (Officials of the Maratha Morcha were aggressive)
विनायक मेटे यांच्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेनंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर मदत मिळाली नाही. मदतीसाठी कोणीही थांबले नाही. ॲम्बुलन्स सुद्धा दोन तासानंतर आली. हा सर्व प्रकार काय आहे? अशी विचारणा मराठा आंदोलनाचे नेते बाळासाहेब खैरेपाटील यांनी केली.
मेटेंविषयी हा सर्व प्रकार काय घडला आहे? हे आम्हाला समजलेच पाहिजे. मेटे यांचा घात झाला का? याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशा शब्दात मराठा आंदोलनाचे नेते बाळासाहेब खैरे यांनी आपले मत मांडले आहे.
आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक होती. ११ वाजता भेटणार होतो. त्यानंतर १२ च्या सुमारास ही बैठक पार पडणार होती. मुख्यमंत्र्यांनी काय तो निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा मोर्चा बसणार नाही, असा इशाराही यावेळी बाळासाहेब खैरे यांनी दिला.
दरम्यान विनायक मेटे यांच्या वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर काय घडले? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ड्रायव्हर म्हणाला, ‘अपघात झाल्यानंतर आम्हाला वैद्यकीय मदत लवकर मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी, गाड्यांना थांबवण्यासाठी मी पार रस्त्यावर झोपलो. पण गाड्या थांबल्या नाहीत.’
‘दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला. त्यानंतर आम्हाला मदतीसाठी यंत्रणा हलली. ॲम्बुलन्स आल्यानंतर आम्हाला उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.’ या सर्व घटना प्रकारामुळे गंभीर जखमी झालेल्या विनायक मेटे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते.
महत्वाच्या बातम्या-
५२ कुळे असो की १५२..कितीही कुळं उतरली तरी शिवसेना कुणी संपवू शकत नाही; ठाकरेंनी ठणकावले
मी जर तिसरा डोळा उघडला तर.., मंत्रिपदाची शपथ घेताच गुलाबराव पाटील विरोधकांवर बरसले
Nawab Malik : नवाब मलिकांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्वाची अपडेट, रुग्णालयातील मुक्काम वाढला