Share

विक्रम गोखलेंची प्रकृती सुधारली, व्हेंटीलेटरही काढणार; स्वत: डॉक्टरांनीच दिली महत्वाची अपडेट

vikram gokhale

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितले.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. ‘त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळे उघडतात. पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटरची गरज भासणार नाही.

तसेच बीपी आणि हृदयाचे कार्य व्यवस्थीत सुरू आहे. दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. ही सर्व माहीती अधिकृत आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नये.

बुधवार पासून त्यांच्या निधनाच्या अफवा मीडियावर पसरत आहेत. पण ते व्हेंटीलेटरवर आहेत. त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी खरं काय ते सांगीतलं होतं.

“बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. असं पत्नी वृषाली गोखले यांनी सांगीतलं होतं.

विक्रम गोखले यांना 5 नोव्हेंबर रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं. “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत होत्या. असं वृषाली गोखले यांनी सांगितलं होतं.

विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे. निधनाच्या अफवांमुळे कुटुंबीयांना प्रचंड मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. समाज माध्यमांवर अनेक कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहीली होती. पण सद्या तरी निधनाची ही बातमी अफवाच ठरली आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर हा दुर्मिळ आजार झाल्यामुळे उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची खूपच प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

विक्रम गोखले यांनी १९७ साली वयाच्या २६व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता, ज्याचे नाव होते परवाना. विक्रम गोखले हे ‘हम दिल दे चुके सनम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी ओळखले जातात. या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

विक्रम गोखले यांना २०१० मध्ये मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत.

महत्वाच्या बातम्या
Vikram Gokhale : अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खुपच चिंताजनक; धक्कादायक माहिती आली समोर
सुर्या तुफानी शतक झळकवत असतानाच ‘या’ संघाने बनवला विश्वविक्रम; फक्त १५ चेंडूत जिंकला सामना
वडिलांचे पंक्चरचे दुकान, आई विकायची बांगड्या; जिद्दीच्या जोरावर बनला IAS अधिकारी

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now