Share

Vikram Gokhale : अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खुपच चिंताजनक; धक्कादायक माहिती आली समोर

vikram gokhale

vikram gokhale condition  | प्रसिद्ध मराठी अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आता त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून ते डॉक्टरांच्या नजरेसमोर आहे. अशात त्यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांची स्थिती खुप गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. पण कुटुंबियांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी नुकताच आपला ८२ वाढदिवस साजरा केला होता.

गेल्या महिन्यात ३० ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर काहीच दिवसांत ते आजारी पडले. त्यामुळे त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आता त्यांची प्रकृती खुपच बिघडली आहे.

विक्रम गोखले हे पुण्यातील रुग्णालयात दाखल आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती CINTA चे ज्येष्ठ अध्यक्ष मनोज जोशी यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते विक्रम गोखले लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहे.

विक्रम गोखले यांनी १९७ साली वयाच्या २६व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता, ज्याचे नाव होते परवाना. विक्रम गोखले हे ‘हम दिल दे चुके सनम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी ओळखले जातात. या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

विक्रम गोखले यांना २०१० मध्ये मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Iran : शाब्बास पोरांनो! तुम्हाला काहीही शिक्षा मिळो, पण घरी गेल्यावर इराणच्या माता-भगिनी अभिमानाने तुमचे चुंबन घेतील
suryakumar yadav: न्यूझीलंड टी-20 मालिकेनंतर सूर्यकुमार यादवसाठी आली आनंदाची बातमी, हार्दिकचाही मोठा फायदा
Bhagatsingh koshyari : आता थेट न्यायालयच राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करणार? हायकोर्टातून मोठी अपडेट आली समोर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now