vijay kedia five tips for investor | शेअर बाजाराच्या जगात विजय केडिया यांना सर्वजण ओळखतात. विजय केडिया ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली होती. विजय केडिया यांना मिडकॅप शेअर्सचा राजा म्हटले जाते. ट्रेंडलाइन या वेबसाइटनुसार, त्यांची कंपनी केडिया सिक्युरिटीज ही स्टॉकच्या ट्रेंडची माहिती देते.
विजय केडियांची मार्च २०२२ पर्यंतची एकूण संपत्ती ७९२ कोटी रुपये आहे. मार्च २०२२ पर्यंत त्याच्या पोर्टफोलिओमध्ये १६ वेगवेगळे स्टॉक होते. विजय केडिया यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा जवळपास ३० वर्षांचा अनुभव आहे. ते अशा शेअर्समध्ये पैसा गुंतवतात, ज्यात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देण्याची ताकद असते.
विजय केडिया यांचाही राकेश झुनझुनवाला यांच्यावर खूप विश्वास होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ट्विटरवर त्यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या गुंतवणूकीच्या पाच खास टीप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही चांगली कमाई करु शकतात.
१- गुंतवणूक करणे सोपे आहे, ते कठीण करू नका- विजय केडिया यांचे मत आहे की, गुंतवणूक करणे खूप सोपे आहे, ते अवघड बनवू नये. ते म्हणतात की तुमच्याकडे कितीही कमी पैसे असू द्या, तुम्ही कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करु शकतात. ते म्हणतात की गुंतवणूक करणे अवघड नसते.जेव्हा तुम्ही गुंतवणुकीपूर्वी त्या कंपनीला पुर्ण जाणून घ्याल. तिचे व्यवहार समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला गुंतवणूक करणे सोपे जाईल.
२- ब्रोकर रेकॉर्ड वाचणे आवश्यक आहे- विजय केडिया ही सर्व ब्रोकर्सचे रिपोर्ट वाचत असतात. ते म्हणतात की तुम्ही फक्त अलीकडचे रिपोर्ट्स वाचलेच पाहिजे असे नाही. तुम्ही जुने रिपोर्ट्स सुद्धा वाचू शकतात. जर तुम्ही ब्रोकर्सच्या संशोधन रिपोर्ट्स वाचल्या तर तुमचे विश्लेषण कौशल्य वाढेल. त्यामुळे तुम्हाला चांगला स्टॉक निवडता येऊ शकतो. ५०० ब्रोकर रिपोर्ट्स वाचणारा एक चांगला गुंतवणूकदार होऊ शकतो.
३- गुंतवणूक पदवीने होत नाही तर ज्ञान आणि संयमाने केली जाते- विजय केडिया यांनी काही वर्षांपूर्वी आयआयएम बंगलोर येथे भाषण दिले होते. त्या भाषणात ते म्हणाले होते की, कोणतीही पदवी घेऊन गुंतवणूक शिकता येत नाही. त्यासाठी गुंतवणुकीची माहिती आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजाराचा नीट अभ्यास केला पाहिजे. गुंतवणुकीसाठी संयम आणि धैर्य हे खूप महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणतात. शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे लोक अनेकदा तणावात येतात आणि चुकीचे निर्णय घेतात. अशा परिस्थितीत संयम आणि धैर्य खूप महत्वाचे आहे.
४- मॅनेजमेंट ऍनेलिसिस करा- विजय केडिया यांचे मत आहे की, कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीच्या मॅनेजमेंटबद्दल सर्व गोष्टी जाणून घ्या. जर तुम्ही ऍनेलिसिस केलं नाही, तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. एखाद्या कंपनीचे मॅनेजमेंट खराब असेल तरीही त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर नुकसान होण्याची शक्यता असते.
५- आपण कशात पैसे गुंतवले आहे हे सतत पाहत राहा- प्रत्येक गुंतवणूकदाराने वेळोवेळी त्यांच्या गुंतवणुकीचा रिव्ह्यु केला पाहिजे. यात्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या कंपनीत पैसे गुंतवणूक ती योग्य आहे की नाही. जर कंपनीचे मॅनेजमेंट बदलले आणि ते खराब होत चालले असेल, तर तुम्ही वेळेतच त्या कंपनीतून तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या-
Mps resignations : राज्यातील ‘या’ दोन खासदारांनी दिले तडकाफडकी राजीनामे; धक्कादायक कारण आले समोर
Share Market : २ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला तब्बल १६ हजार टक्के परतावा
Supreme Court: जगात कोठेच न्यायधीश आपल्या भावाला न्यायाधीश बनवत नाही, पण भारतात.., कायदेमंत्र्यांनीच उपस्थित केले प्रश्न