Share

‘कोण नवनीत राणा? ती तर बारमध्ये काम करायची…; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची टिका

navneet

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. तसेच राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दिक वाद अजूनही थांबलेला नाहीये.

आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं हिंदुत्व हवं, असे म्हणतं शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभेचा प्रचार केला आहे. याचाच धागा पकडत राणा यांनी ठाकरेंवर पुन्हा जहरी शब्दात निशाणा साधला.

याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “इतकी वर्षे त्यांच्या घरातली चूल ज्यामुळे पेटली, आज तेच हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलत आहेत. आजपर्यंत ज्यांच्या आशिर्वादाने, मोदींचा आशिर्वाद घेऊन शिवसेना २०१४, २०१९ मध्ये निवडून आली. पण आज खुर्चीच्या हव्यासापोटी शिवसेना त्यांच्या विरोधात उभी आहे हे सगळ्या देशाने पाहिलं आहे.”

तर आता राणा यांनी केलेल्या या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘कोण नवनीत राणा?,’ असा संतप्त सवाल उपस्थित करत त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना का एवढं महत्व द्यायचं?, अशा जहरी शब्दात विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

याबाबत त्या माध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘खोटं जात प्रमाणपत्र दाखवून द्या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्व द्यायची काहीच गरज नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, आज पुन्हा राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.  राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. याचाच धागा पकडत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. ‘उद्धवसाहेब..! तुमच्यात ताकद असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’, असं त्यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“पवार साहेब पाकिस्तानात तुमचं स्वागत केलं कारण त्यांना त्यांची माणसं बरोबर कळतात”
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शामीने सुनावले, ‘थोडं थांबा, नुसता वेग कामाचा नाही..
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शमी म्हणाला, त्याच्याकडे वेग आहे पण…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now