सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय तापमान वाढलेले असातानाच विधान परिषदेच्या दहा जागांसाठी काल निवडणूक जाहीर झाली आहे. पुढील महिन्यात 20 जूनला 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
त्यामुळे आता विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहण्याचे ठरणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता अवघ्या राज्याचे सोबतच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तसेच या निवडणुकीमधून जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या १० जागा भरल्या जातील. यासाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार असून निकाल देखील स्पष्ट होणार आहे. यामुळे आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे.
तर दुसरीकडे विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने आता कोणत्या आमदारांना पुन्हा संधी मिळते आणि कुणाचा पत्ता कट होणार याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. भाजपकडून काही नाव समोर आली आहेत. अनेक आंदोलनातून कायम चर्चेत राहिलेले सदाभाऊ खोत यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विनायक मेटे हे देखील सध्या गॅसवरच आहेत. भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याच बोललं जातं आहे. यामध्ये नव्या सदस्यांत भाजपकडून पंकजा मुंडे, कृपाशंकरसिंह, माजी मंत्री अनिल बोंडे यांना संधी मिळू शकते, असं बोललं जातं आहे. यामुळे आता कोणाला लॉटरी लागणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रामराजे निंबाळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. रामराजे निंबाळकर हे सध्या विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते असं बोललं जातं आहे. तर सुभाष देसाई यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. देसाई हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्याचा मुलगा असल्यामुळे…; मराठी सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर आदिनाथ कोठारेचा गौप्यस्फोट
यासिन मलिकला जन्मठेप दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट; शाहिद आफ्रिकीने ओकली गरळ
शिखर धवनला वडिलांनी पोलिसांसमोरच केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर