Share

भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का? उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटे संतप्त

vinayk mete
भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी डावलल्याने अनेक नेते नाराज झाले आहेत. भाजपने विधानपरिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर केले असून त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत सदाभाऊ खोत यांना डावलण्यात आलं आहे. शेतकरी प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेले सदाभाऊ खोत यांची देखील डाळ काही शिजली नाही.

याचबरोबर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांना देखील भाजपने डावलले आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मेटे नाराज झाले आहेत. भाजपने आम्हाला काय फक्त वापरुन घेतलं का? असा संतप्त सवाल विनायक मेटेंनी उपस्थित केला आहे. ते याबद्दल माध्यमांशी बोलत बोलत होते.

यावेळी बोलताना मेटे म्हणाले, ‘विधान परिषदेवर तुम्हाला आम्ही शंभर टक्के उमेदवारी देणार असे सांगितले होते. मात्र उमेदवारी दिली नाही,’ असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ‘मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा उपयोग झाला की मध्येच टाकून द्यायचे असी तर काही निती भाजपची नाही ना?’, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलतान मेटे म्हणाले, ‘आज संध्याकाळी मी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन आमदारांना घेऊन फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यामुळे आता मेटे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सध्या राजकीय विधान परिषदेसाठी खलबते सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने यादी जाहीर केली आहे. पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडेंना यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now