आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, आज विधान परिषदेची निवडणुक पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. विधान परिषदेच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
आज अखेर मतदानाचा दिवस आला आहे. राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह भाजपाचे आमदार विधान भवनात पोहोचले आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.
याचबरोबर शिवसेनेचे आमदार एका बसमधून विधान भवनाकडे रवाना झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील आमदारांसोबत बसमध्ये उपस्थित आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेचे आमदार विधान भवनाकडे रवाना झाले आहेत.
तर दुसरीकडे एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची चार ते पाच मतं काँग्रेसला देणार असल्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मते नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या २९ आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजेपासून सुरुवात झाली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून, पाच वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. यामुळे आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. राज्याच लक्ष सध्या या निवडणुकीकडे लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
विधान परिषदेसाठी आज मतदान; मतांची फोडाफोडी होऊ नये यासाठी चारही पक्षांची ‘ही’ जबरदस्त रणनीती
‘मोदींकडून कोणतीही मदत घेतली नाही’; मोदींनी उल्लेख केलेल्या अब्बास अलींचा खुलासा
‘नोटाबंदी केली तेव्हा ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आता अग्निपथ योजनेमुळे…’; ओवैसींची मोदींवर टीका
अखेर सदाभाऊकडून भांडाफोड! ‘तो’ हॉटेलवाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; पुरावा केला सादर