Share

VIDEO: कुंकू का लावले नाही?, बजरंग दलातील लोक ख्रिश्चन महिलांना विचारत होते जाब; महिलांनी ‘अशी’ घडवली अद्दल

भारत हा विविधतेने नटलेला देश असून, यामध्ये विविध धर्माचे,जातीचे, वंशाचे लोक एकत्र बंधुभावाने राहिले पाहिजे असे संविधानात आहे. मात्र, भारतातील काही संघटनांमुळे आजही या गोष्टी पूर्ण होण्यास अडथळा येतो. आजही भारतात काही ठिकाणी भेदभाव करणे, ठराविक धर्माचेच लोकांनी पालन करावे याची जबरदस्ती केली जाते. अशीच एक घटना घडली असून, ख्रिसमसचा कार्यक्रम रोखणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना महिलांनी चांगलीच चपराग लगावली आहे.

एका दलित घरात ख्रिसमस साजरा केला जात असताना, काही हिंदूत्ववाद्यांचा गट त्यांच्या घरात घुसला. या गटाने ख्रिसमस साजरा करण्यापासुन या लोकांना अडवले. मात्र, घरातील महिलांनी या गटाला चांगलेच हुसकावून लावले. सध्या सोशल मीडियावर हिंदूत्ववाद्यांच्या गटाशी सामना करणाऱ्या या महिलांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमधील स्त्रिया गुंडगिरीला बळी न पडता उलट त्यांच्या घरात घुसलेल्या पुरुषांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून येत आहेत. या महिलांनी त्या गटाला चांगलेच पिटाळून लावले. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हि घटना घडली आहे. बराच वेळ चालणाऱ्या या वादानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. ही घटना तुमाकुरूच्या कुनिगल तालुक्यातील बिलीदेवालय गावात घडली आहे.

तालुक्यातील बजरंग दलाचे नेते रामू बजरंगी यांनी सांगितले कि, या दलित कुटुंबानी गेल्या एक महिन्यांपासून ख्रिश्चन प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी याच घरात ख्रिसमस साजरा केला जात होता. त्यामुळे बजरंग दलातील काही लोकांना याची माहिती मिळताच ते संबंधित घरात गेले आणि ख्रिसमस का साजरे करत आहेत, अशी विचारणा केली. त्यांच्या या प्रश्नावर घरातील रहिवाशांनी प्रतिसाद दिला की ते ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे आहेत आणि ख्रिसमस साजरा करण्यात काही एक गैर नाही.

बजरंग दलाच्या गटाने घरातील महिलांना विचारले कि, त्यांनी सिंधूर का लावले नाही? यावेळी महिलांपैकी एका महिलेने उत्तर दिले कि, “त्यांनी काय करावे काय नाही हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. त्याच्याशी बजरंग दलाचा काहीही संबंध येत नाही. घरी ख्रिसमस साजरा करण्यात काहीच चुकीचे नाही, आणि ख्रिसमस साजरा नका करू सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल केला. तसेच महिलांनी सांगितले कि, आम्ही हिंदू आहोत मात्र ख्रिश्चन धर्माचे पालन करतो. आम्ही धर्मांतर केले नाही. आम्हाला ख्रिसमस साजरा करायचा असेल तर ती आमची इच्छा आहे.”

त्या दलित कुटूंबातील महिलांचा आणि बजरंगी दलाचा वाद बराच वेळ चालू असल्याने पोलिसात कोणीतरी याबद्दल तक्रार केली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांच्या मते, बजरंग दल आणि त्या महिलांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावरून जो वाद झाला तो केवळ तोंडी झाला, यामध्ये कोणताही हिंसाचार झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम
|रोहितच्या जागी भारतीय संघाला मिळाला नवा कर्णधार, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
तालिबानच्या क्रुरतेचा कळस, माजी लष्करी अधिकाऱ्याचा केला छळ, व्हिडीओ पाहून धक्का बसेल  

इतर

Join WhatsApp

Join Now