आयुष्यात कधी तुमचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही. रातोरात स्टार बनणारे, गरिबीतून श्रीमंत बनणारे तुम्ही पाहिले असतील. असाच आता ही बदाम विकणारा व्यक्ती सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भुवन बदायकर असं या बदाम विकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तसेच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पश्चिम बंगालचा आहे. (video viral of person who sold kaccha badam impressed the whole internet)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सायकलवर त्याने विकण्यासाठीचे बदाम ठेवले आहेत. घरोघरी जाऊन बदाम विकता विकता तो यमकांसह ‘कच्चा बादाम’ गाणं म्हणू लागतो. त्याचं हे गाणं इतकं अप्रतिम आहे की ते पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी लोक हा व्हिडीओ पाहत आहेत.
याचबरोबर हे गाणं लोकांना इतकं आवडू लागलंय की, आता तर या गाण्यांवर लोकांनी त्यांच्या डान्सचे बरेच व्हिडीओ बनवले आहेत आणि शेअरही केले आहेत. भुवननेही हातात काही बांगड्या, मोबाईल आणि चैन घेतली असून तो दुसऱ्या हाताने वाजवताना दिसून येत आहे.
https://youtu.be/qcUi0UcZhRY
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, भुवन हा बीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर ब्लॉकमधील कुरलपुरी गावचा रहिवासी आहे. भुवन सायकलवर एक प्लास्टिक पिशवीत बदाम घेऊन विकतो. याशिवाय काही दागिने आणि एक तुटलेला मोबाईल त्याच्याकडे शिल्लक आहे. तो कुठेही गेला तरी ‘कच्चा बदाम’ म्हणत आपल्या खास पद्धतीने बदाम विकतो.
याचबरोबर हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात एक व्हायरल व्हिडीओ सुद्धा तुम्हाला रातोरात स्टार बनवू शकतो. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी पॅराग्लायडिंग मॅन म्हणून चर्चेत आलेला ‘लॅंड करा दे’ असं ओरडणारा मुलगा…आज तो लाखोंमध्ये कमवतोय.
उत्तर प्रदेशमधल्या बांदा इथे राहणारा विपिन कुमार साहू याच्याबाबतीतही अगदी असंच घडलंय. मनालीच्या एका ट्रिपने विपिनचं नशीबच बदलून गेलंय आण तो एका रात्रीत सेलिब्रिटी बनलाय. हल्ली तर तो आता टीव्ही शोजपासून ते अगदी वेगवेगळ्या म्युझिक अल्बममध्ये झळकताना दिसतोय. सोबत तो आता उद्योजक सुद्धा बनलाय.
महत्त्वाच्या बातम्या
१२० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी २४ तास पहारा देतात गावकरी; असं काय खास आहे त्यात
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात महाराष्ट्रात एफआयआर दाखल; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या..
वयाच्या २१ व्या वर्षीच तुमची मुलगी बनेल लखपती, फक्त ४१६ रुपये गुंतवा आणि मिळवा ६५ लाख
सर्वांसमोर अभिनेत्याला किस करणं शिल्पाला पडलं होतं महागात, १५ वर्षांनंतर झाली सुटका; पहा ‘तो’ व्हिडिओ