VIDEO: क्रीडा मंत्र्याचा भर मैदानात रोमँटिक अवतार, शतक ठोकल्यानंतर खिशातून काढलं तिच्यासाठी लव्ह लेटर

बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. कर्नाटक येथे मध्य प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मनोज तिवारीने १२ चौकारांसह १०२ धावांची शानदार खेळी केली. शतकी सेलिब्रेशन करताना त्यांनी खिशातून एक पत्र काढले ज्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

मनोज तिवारीच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे २९ वे शतक होते. त्याच्या खेळीमुळे बंगालचा संघ २७३ धावांचा आकडा गाठू शकला. मनोज तिवारीने शतक झळकावल्यानंतर एक खास पत्र खिशातून काढलं, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये तिवारीने हार्टचे चित्र काढले आहे.

तसेच पत्रात पत्नी सुष्मिता आणि मुलांचे नावही लिहिले. कुटुंबीयांसाठी लव्ह असे लिहीले आहे. सुष्मिता दिसायला एवढी सुंदर दिसते की बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना देखील ती मागे टाकू शकते असे म्हटले जाते. मनोजने २०१३ मध्ये सुष्मिता सोबत लग्न केले आहे.

सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी मोसमातील मनोज तिवारीचे हे सलग दुसरे शतक आहे. तिवारीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झारखंडविरुद्धही १३६ धावा केल्या होत्या. एकेकाळी ५४ धावांवर ५ विकेट गमावल्याने बंगालचा संघ अडचणीत दिसत होता.

मात्र त्यानंतर मनोज तिवारी आणि शाहबाज अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी करत डाव पुढे नेला. शाहबाज अहमदनेही ११६ धावांची शानदार खेळी केली. तत्पूर्वी, मध्य प्रदेशचा पहिला डाव ३४१ धावांवर आटोपला. विकेटकीपर हिमांशू मंत्रीने १६५ आणि अक्षत रघुवंशीने ६३ धावा केल्या. अशाप्रकारे मध्य प्रदेशला पहिल्या डावाच्या आधारे ६८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

मनोज तिवारी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहतो. मनोज तिवारीने २०१३ मध्ये सुष्मिता रॉयसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले होते. सुष्मिता अनेकवेळा पती मनोजला ग्राउंडवर चीअर करताना दिसली आहे. मनोज तिवारीने भारतासाठी एकूण १५ सामन्यांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये त्याला फारशी कामगिरी करता आली नाही.