‘बिग बॉस’ची ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धक आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला (Urfi Javed) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या युनिक स्टाईल आणि असामान्य शैलीने तिने ही ओळख निर्माण केली आहे. आजच्या काळात इतर अभिनेत्रींप्रमाणे तिचेही लाखो फॅन फॉलोइंग आहेत. तिच्या चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल खूप आवडते.(Urfi Javed, Bigg Boss, Social Media, Unique Style)
उर्फीने लेदर पॅंट आणि पिवळी ब्रा परिधान केलेला तिचा नवीन फॅशन व्हिडिओ शेअर केला आहे. उर्फीने स्थानिक बाजारातून विकत घेतलेली पर्स आणि नेकपीस तिने या व्हिडिओमध्ये हायलाइट केला आहे. लोकांनी तिच्या नेकपीस आणि हँडबॅगकडे लक्ष दिले नाही, परंतु तिच्या कपड्यांवर पुन्हा नकारात्मक टिप्पण्यांचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय.
https://www.instagram.com/reel/CXX-Wp4IL6_/?utm_source=ig_web_copy_link
फॅशन जगतातील नवीन नाव म्हणजे उर्फी जावेद होय. फॅशनला तिने आपली वेगळीच व्याख्या दिली आहे. केवळ बिकिनी आणि स्विमसूटच नाही तर साडी आणि स्टॉकिंग्जसह देखील उर्फीने खूप बोल्ड फॅशन स्टेटमेंट केले आहे. या बोल्डनेसमुळे तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. पुन्हा एकदा, उर्फी तिच्या नवीन सिझलिंग लूकसाठी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
उर्फीने लेदर पॅंट आणि पिवळी ब्रा परिधान केलेला तिचा नवीनतम फॅशन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर लोकांनी खूप वाईट कमेंट केल्या आहे. एका यूजरने लिहिले आहे, ‘मला समजत नाही की दीदी, तु कपडे का घालते, मान्य आहे की फॅशन आहे पण जरा जास्तच आहे.’ एकाने लिहिले, ‘काय दाखवत आहेस नक्की’.
आणखी एका यूजरने लिहिले आहे ‘हे देवाची काय वेळ आली आहे.’ आणखी एका वापरकर्त्याने बरेच काही सांगितले आहे. ‘वेस्टर्न कपड्याच्या नावाखाली काहीही. शी. तुला काय दाखवायचे आहे? तौबा तौबा तौबा… कुटुंबापासून वेगळे होण्याचे सर्वात मोठे कारण स्पष्टपणे दिसत आहे. दुसर्या यूजरने लिहिले ‘नेकपीस दाखवण्यासाठी सामान्य कपडे देखील घालता येतात.’
लोक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये उर्फीवर टीका केली. याआधीही उर्फीला तिच्या फॅशन आणि सेलिब्रिटींना कॉपी केल्याबद्दल ट्रोल केले गेले आहे. पण उर्फीला ट्रोल्सला कसे उत्तर द्यायचे हे देखील माहित आहे. त्यांना न जुमानता तिने आपले पद कायम ठेवले आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या नवीन फॅशनेबल लुकने थक्क करते.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात राहता तर मराठी यायला पाहिजे; पत्रकाराने उर्फी जावेदचा केला पाणउतारा
VIDEO: शर्टाचे बटन खोलून उर्फी जावेदने केला डान्स, युजर्स म्हणाले, काहीतरी नवीन करत जा
मिडीयावर भडकली उर्फी जावेद, सामंथालाही वादात ओढलं; म्हणाली, तिला स्पेशल ट्रीटमेंट आणि मला..
इफ्तार पार्टीत उर्फी जावेदने सलवार कमीज घालून केला कहर, सांगितले या अटीवर करणार लग्न