मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सई तिचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या सतत संपर्कात राहते. आता नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे.
सईने जो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्याचा संबंध हा अभिनेत्री प्राजक्ता माळीशी आहे. सईचा हा व्हिडीओ सोनी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सई प्राजक्ता माळीनं दिलेल्या चॅलेंजबद्दल बोलताना दिसत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं १५ ऑगस्ट पासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. या नवीन पर्वाच्या निमित्तानं सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत. यावेळी नवीन पर्वाच्या निमित्तानं प्राजक्तानं सईला एक चॅलेंज दिलं आहे.
दरम्यान, व्हिडीओच्या सुरुवातीला सई म्हणते की, प्राजूनं मला tounge twister चं चॅलेज दिलं आहे. मी प्रयत्न करणार आहे… प्राजू तू मला चॅलेंज दिलं आहे त्याची सुरुवात मी हर्रर्रर्रर्र…. अशी करणार आहे. यानंतर सई एक जिभेची बोबडी वळवणारा शब्द दोन ते तीन वेळा बोलते आणि त्यानंतर प्राजू मी जिंकले असे म्हणते.
तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या व्हिडीओला चाहत्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरातील आवडणार कार्यक्रम झाला आहे. हा कार्यक्रम प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.
अजूनही चाहते या कार्यक्रमाचा रिपीट एपिसोड पाहतात. आता या कार्यक्रमाच्या नवीन भागाला सुरुवात झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- चार वार हास्याचा चौकार!’ असे या नव्या पर्वाचे नाव आहे. सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.