अखेर सकाळी पोलिसांच्या हातून निसटलेले मनसे नेते संदीप देशपांडे समोर आले आहेत. देशपांडे यांनी एक व्हिडीओ जारी करून पोलिसांना विनंतीवजा इशारा दिला आहे. याचबरोबर घडल्या प्रकारावर सविस्तर भाष्य करत आपली भूमिका देशपांडे यांनी समोर आणली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांना आज मुंबई पोलीस अटक करण्यासाठी प्रयत्न आले होते. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना चकवा दिला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यामुळे काही वेळ पोलिसांचा गोंधळ उडाला होता. तर दुसरीकडे राज्याच्या गृहमंत्रालयाने थेट देशपांडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अशातच देशपांडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘मी पोलिसांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी पळून गेलेलो नाही. माझ्या घरी बायको आणि सहा वर्षांचा मुलगा असतात, इतरांच्या घरी जातात तसे पोलीस रात्री बेरात्री बारा वाजता तिथे जातील. मी घरी नाहीये, सध्या मी वकीलांचा सल्ला घेत आहे, हे लक्षात ठेवावे, असं व्हिडिओमध्ये देशपांडे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, देशपांडे यांनी मुंबई पोलीस दलातील महिलेशी केलेल्या गैरवर्तनाची चर्चा सध्या सुरू आहे. यावर बोलताना देशपांडे म्हणतात, ‘महिला पोलिसाने देवाला स्मरून सांगावे की आम्ही धक्का मारला किंवा स्पर्श केला, असं देशपांडे यांनी म्हंटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी घडलेला प्रकार सविस्तर सांगितला आहे.
याबाबत बोलताना देशपांडे म्हणतात, ‘पीआयनी बाजुला चल बाजुला चल असे म्हटले. तेव्हा सात ते आठ पुरुष पोलिसांनी आम्हाला गराडा घातला होता. त्या दबावामुळे आम्ही कारच्या दिशेने गेलो, मात्र तिथे महिला पोलिसाला स्पर्शही झाला नाही, असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आपल्यावर खोटेनाटे आरोप करत गुन्हे दाखल केले जात आहेत, असा खळबळजनक आरोप देशपांडे यांनी केला. तर दुसरीकडे या प्रकरणाची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. ते म्हणाले, देशपांडे यांनी मुंबई पोलीस दलातील महिलेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी घेतली आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करा, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो झाला बंद; सोशल मीडियावर होतोय मीम्सचा पाऊस
मागील जन्मात मी झाशीची राणी आणि तात्या टोपेंसोबत लढत असेल; फडणवीसांचे मोठे वक्तव्य
प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या भिडे गुरुजींवर मुस्लीम डॉक्टराने केले उपचार; स्वत:चा पुरस्कार सोहळा केला रद्द
10 वर्ष जुना अपघात आठवून अजूनही घाबरतो ‘अजय देवगण’, ‘या’ गोष्टीची वाटते भिती