आज महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल झाले. टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत हजारोंच्या दिंड्या विठुरायाच्या मंदिराजवळ पोहोचल्या आहे. अनेक नेते, मंत्री त्यांच्या स्वागताला वाटेवर अनेक ठिकाणी गेले. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील सामील आहेत. (Video of Demon making tea goes viral)
आषाढी एकादशी निमित्त रावसाहेब दानवे पंढरपुरात जात वारकऱ्यांमध्ये आषाढी एकादशीचा दिवस साजरा केला. त्यावेळी मतदार संघातील आलेल्या वारकऱ्यांची प्रेमाने विचारपूस देखील केली. दानवेंनी चक्क स्वतःच्या हाताने चहा बनवून वारकऱ्यांना दिला.
भोकरदनमधील शिरसगावचे सुभाष वाघ अनेक वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारीत चहा बनवून वारकऱ्यांना देत आहेत. ज्ञानोबांची पालखी पंढरपुरात पोहोचल्यावर वाघ यांची चहाचे फिरते हॉटेल पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या सेवेत त्या ठिकाणी होतेच.
सुभाष वाघ यांच्या हॉटेलमध्ये शिरत केंद्रीय रेल्वे कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वतःच्या हाताने चहा बनवला आणि वारकऱ्यांना दिला. वारकऱ्यांनीही या चहाचा आनंद लुटला आहे.
रावसाहेब दानवे हे अनेक वर्षांपासून भाजपचे खासदार राहिले आहेत. सध्या ते केंद्रीय मंत्री पदावर कार्यरत आहेत. रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण रांगड्या शैलीमध्ये बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
त्यांचे अनेक किस्से राजकीय वर्तुळात गाजले आहेत. आता हा चहा बनवण्याचा नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील रावसाहेब दानवे यांनी काम पाहिले आहे.