Share

VIDEO: याला म्हणतात खेळाडूवृत्ती! द्रविड-कोहलीच्या ‘त्या’ कृतीवर चाहते फिदा, श्रीलंकन खेळाडूंनीही केले कौतुक

बेंगळूरू | लहानमुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वच स्तरात क्रिकेटचा क्रेझ हा मोठ्या प्रमाणात दिसतो. तसेच क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच बीसीसीआयने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला.

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहली दिसत आहेत. या दोघांनी या व्हिडीओमध्ये अशी कामगिरी केली कि चाहत्यांनी त्यांच्यवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

हा व्हिडीओ एवढा व्हायरल होण्यामागचे कारण काय तर, श्रीलंकेचा जलद गोलंदाज सुरंगा लकमलची फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्धची दुसरी कसोटी हि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरची मॅच असेल. त्यामुळे, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी त्याची भेट घेतली.

द्रविड आणि कोहलीने सुरंगा लकमल यांची भेट घेतली आणि त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करताना श्रीलंका बोर्डाने म्हटले की, हेड कोच राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी सुरंगा लकमल याला शुभेच्छा दिल्या. तसेच लकमल अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असल्याचेही सांगितले. विराट आणि द्रविडच्या या कामगिरीवर चाहते भलतेच फिदा झाले. आणि त्यानंतर चाहत्यांनी सोशल मिडीयाद्वारे दोघांवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या डावात २५२ धावा करणाऱ्या टीम इंडियाने श्रीलंकेचा डाव फक्त १०९ धावांवर गुंडाळून टाकला त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने ३०३ धावा करून श्रीलंकेपुढे विजयासाठी ४४७ धावांचे मोठे आव्हान दिले. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने १ बाद तर २८ धावा केल्या होत्या.

दरम्यान, श्रीलंकेच्या सुरंगा लकमल या जलद गोलंदाजाने ७० कसोटीत १७१ विकेट घेतल्या आहेत. तर, ४७ धावात ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. लकमलने ८६ वनडेत १०९ विकेट तर ११ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.

यावेळी श्रीलंकेचा जलद गोलंदाज सुरंगा लकमलने देखील आपले मनोगत व्यक्त केले. लकमल त्याच्या भावना व्यक्त करत म्हणाला, आपल्या देशाची सेवा करण्यासाठी तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी श्रीलंका बोर्डाचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला शानदार अशी संधी दिली. माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या श्रीलंका बोर्डाशी जोडून राहिल्याचा मला आनंद आहे. अशा शब्दात लकमलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या:
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोन अपघातांमध्ये ९ ठार तर २१ जखमी
पाकिस्तानी दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला जेवणात दाल-रोटी दिल्याने चाहते संतापले, म्हणाले..
असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार
पुन्हा विचित्र ड्रेसमुळे ट्रोल झाली उर्फी जावेद, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘न्युड शुट आहे का?’

 

इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now