अभिनेता सलमान खान हा बॉलीवूडमधील दबंग अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना सलमान खान ने लॉन्च करून त्यांच्या करियरमध्ये हातभार लावलेला आहे. परंतु आता सलमान खान हा एका विचित्र गोष्टीमुळं चर्चेत आला आहे.
कारण एका कार्यक्रमात सलमान खान डान्स करत असताना तो आपली सिग्नेचर स्टेपच विसरल्याने त्याची चांगलीच तारांबळ उडाली. Da-Bangg The Tour – Reloaded मधील ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम दुबईत ‘एक्स्पो 2020’ मध्ये झाला होता. आता त्यावरुनच सलमान खानला ट्रोल केलं जात आहे.
https://twitter.com/SalmanSajidBha6/status/1497691966720471041?t=rQhwz0Pbnqx2nF096AnpTw&s=19
या कार्यक्रमात सलमान खान त्याच्या किक चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर अभिनेत्री पूजा हेगडे बरोबर डान्स करत होता. परंतु तो अचानक स्टेप्सच विसरला. त्यामुळे त्याला शरमेने मान खाली घालावी लागली. तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही ही गोष्ट धक्कादायक होती. कारण सलमान हा स्टेजवर असताना पहिल्यांदाच डान्स च्या स्टेप्स विसरला होता.
खरंतर या प्रसिद्ध गाण्यात त्याने जँकलीन फर्नांडिस सोबत डान्स केलेला आहे, त्यामुळे या कार्यक्रमात तो पूजा हेगडे बरोबर तेवढा कन्फर्टेबल नसेल म्हणून घडलं असावं. अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत. त्याचबरोबर या मुद्यावरून त्याला त्याच्या हेटर्सनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
किकमधील या गाण्यात जँकलीनचा ड्रेस दातात पकडून सलमान खान ने डान्स केला होता. त्यामुळे ते गाणं रातोरात हिट देखील झालं. परंतु या कार्यक्रमात पूजा चा ड्रेस फिट असल्यामुळे डान्स करताना सलमानला ते दातात पकडता आलं नाही. त्यामुळे त्याचा पचका झाल्याचं पाहायला मिळालं.
परंतु अभिनेता सलमान खानने ज्या प्रकारे यानंतरची परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्याचे काही चाहत्यांनी तोंडभरून कौतुक केले. परंतु काहींनी सलमान खानचा जबर पोपट झाल्याचं म्हटलं आहे. तर एका व्यक्तीने त्याला चक्क मूर्ख म्हटलं आहे. त्यामुळे आता सलमान खान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.