Share

VIDEO: पुणे महापालिकेकडून राष्ट्रध्वजाचा अपमान, वसंत मोरेंनी थेट पोलिसांत केली तक्रार

देशभरात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. आजपासून हर घर तिरंगा या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र, या मोहिमेंतर्गत पुणे महापालिकेनं घरोघरी वाटप केलेल्या राष्ट्रध्वजापैकी काही ध्वज हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.

पुणे महापालिकेनं हर घर तिरंगा या निमित्ताने ज्या राष्ट्रध्वजाचे घरोघरी वाटप केले होते त्यातील काही राष्ट्रध्वज हे निकृष्ट असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे मनसेच्या वतीनं वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात राष्ट्रध्वजाचा अवमानाप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

वसंत मोरे यांनी फेसबुक वरून तक्रार केली होती की, धनकवडी सहकारनगर या प्रभागात ५२ हजारांहून अधिक राष्ट्रध्वजांच वाटप महापालिकेनं केलं आहे. मात्र, त्यातील ४८ हजारांहून आधिक राष्ट्रध्वज निकृष्ट दर्जाचे आहेत. पुण्यातील १५ क्षेत्रीय कार्यालयात देखील निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज मिळाल्याचा दावाही मोरेंनी केला होता.

त्यानंतर, पुणे महानगरपालिकेकडे योग्य चौकशी करून झेंडे बनवणाऱ्या ठेकेदार आणि कंपनी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वसंत मोरे यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच १५ ऑगस्ट आधी या तक्रारीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी मोरे यांनी केली.

https://fb.watch/eTDGwBZZPk/

दरम्यान, आज भारताच्या अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा लावण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. मात्र, तिरंगा ध्वजाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडून निकृष्ट राष्ट्रध्वजांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.

माहितीनुसार, पुणे महापालिकेने तसेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निकृष्ट दर्जाचे ध्वज परत पाठवले आहेत. दुसरीकडे आज अनेक ठिकाणी अतिशय जल्लोषात हर घर तिरंगा मोहीम पार पडली. लोकांनी उत्साहात आज आपापल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकविला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now