Share

VIDEO: मला नको सांगू, तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, भर मैदानात विराट ‘या’ खेळाडूवर संतापला

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टनमध्ये टेस्ट सुरू आहे. भारताने दोन दिवस चमकदार फलंदाजी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मैदानात वेगळाच रोमांच पाहायला मिळाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानात आक्रमक पाहायला मिळाला.

फलंदाजीत आक्रमक असणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानावरही आक्रमक भूमिका घेत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्टमध्येही कोहली आक्रमक झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

आज तिसऱ्या दिवशी मैदानात सामना सुरु असताना इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरेस्टो आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विराट कोहली इंग्लंडचा फलंदाज बेयरोस्टोला भिडल्याने अंपायरला त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करावा लागला.

तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर इंग्लंडचे जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक क्रिजवर आले. त्यानंतर गोलंदाजी करायला मोहम्मद शमी मैदानात उतरला. यावेळी शमीने फेकलेला चेंडू बेयरस्टोला खेळता आला नाही. त्यानंतर कोहली आणि बेयरस्टो यांच्यात वादाला सुरुवात झाली.

मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना जॉनी बेयरस्टोने एक चेंडू मिस केला. त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेल्या विराट कोहली बेयरोस्टोला काहीतरी बोलला. त्यानंतर बेयरोस्टोनंही विराटला प्रतुत्यर दिलं. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि शाब्दिक चकमक झाली. या दोघांमध्ये झालेलं संभाषण माईकमध्ये कैद झालं आहे.

यामध्ये विराट कोहली फलंदाज जॉनी बेयरेस्टो याला म्हणतो, ‘मला सांगू नको काय करायचं ते, तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर’ हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दोघांचा वाद एवढा पेटला की, अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही अंपायर्सने दोघांनाही शांत राहण्यासाठी सांगितलं. त्यानंतर मैदानात तापलेलं वातावरण थंड होताना दिसलं.

खेळ

Join WhatsApp

Join Now