महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करारी नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अमित ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. अमित ठाकरेंच्या साधेपणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Amit Thackeray’s simplicity is being discussed across the state)
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असणाऱ्या अमित ठाकरेंचे तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे. अमित ठाकरे सध्या दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. त्यादरम्यान मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी स्वतः जेवण वाढून घेताना ते दिसले.
एवढ्यावरच अमित ठाकरे थांबले नाहीत तर, स्वतःचे ताट वाढून घेत, सर्वांसोबत जमिनीवर बैठक टाकून जेवण पण त्यांनी केले. अमित ठाकरे यांच्या या साधेपणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
कुठलाही बडेजाव नाही, कुठला लवाजमा नाही … पाय जमिनीवर ठेवून कायम आपला साधेपणा जपणारा माझा नेता … #AmitThackeray ❤️
दौऱ्यावर असताना पुणे जिल्हा अध्यक्ष समीर ठिगळे यांच्या घरी जेवायला गेल्यावर स्वतः स्वयंपाक घरात जावून आपले ताट वाढून घेताना अमितसाहेब ठाकरे … pic.twitter.com/GDbW1Z9y5D— Gajanan Kale (@MeGajananKale) August 16, 2022
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यादरम्यान मनसेचे पुणे शहर प्रमुख समीर थिगळे यांच्या घरी अमित ठाकरे जेवणासाठी गेले होते. त्यावेळचा अमित ठाकरेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये अमित ठाकरे स्वतः किचनमध्ये जाऊन आपले ताट वाढून घेताना दिसत आहेत. तसेच सामान्य माणसांप्रमाणे जमिनीवर बैठक टाकून जेवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत मनसेचे युवानेते गजानन काळे यांनी ‘कुठलाही बडेजाव नाही, कसला लवाजमा नाही, पाय जमिनीवर असणारा साधा माझा नेता..’ अशा शब्दात या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.
अमित ठाकरे कधी मुंबईच्या लोकलमध्ये चढताना दिसतात. कधी कार्यकर्त्याच्या घरी स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेताना दिसतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळून जाण्याची वृत्ती असणाऱ्या अमित ठाकरेंबद्दल मनसे कार्यकर्त्यांमध्ये क्रेझ आहे.
महत्वाच्या बातम्या-
Netaji: वडील स्वतंत्र भारत पाहू शकले नाहीत पण कमीत कमी.., नेताजींच्या मुलीची सरकारकडे मागणी
Vinayak Mete : मेटेंना आधीही जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न? व्हायरल ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ
politics: घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला