Share

पोलिसांनी त्रास दिला तर तुम्ही करू शकता व्हिडीओ रेकॉर्डिंग, न्यायालयाचा मोठा निर्णय

पोलिस ठाण्यात व्हिडिओ बनवणे गुन्हा नाही. असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. सरकारी गोपनीयता कायद्यानुसार निषिद्ध ठिकाणी पोलिस ठाण्याचा समावेश करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत पोलिस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवता येणार नाही.

या वर्षी जुलैमध्ये, न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने रवींद्र उपाध्याय नावाच्या व्यक्तीविरुद्ध मार्च 2018 मध्ये पोलिस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट (OSA) अंतर्गत दाखल केलेला खटला रद्द केला.

आपल्या आदेशात, खंडपीठाने OSA च्या कलम 3 आणि कलम 2(8) चा संदर्भ दिला, जे प्रतिबंधित ठिकाणी हेरगिरीशी संबंधित आहे. पोलिस ठाणे हे कायद्यात नमूद केलेले प्रतिबंधित ठिकाण नाही, असे खंडपीठाने नमूद केले. यावेळी खंडपिठाने महत्वाची टिप्पणी दिली.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 2(8) मध्ये दिलेली निषिद्ध ठिकाणाची व्याख्या प्रासंगिक आहे. ही एक सर्वसमावेशक व्याख्या आहे, ज्यामध्ये पोलीस ठाण्याचे ठिकाण किंवा आस्थापना ज्याला प्रतिबंधित ठिकाण म्हणून मानले जाऊ शकते याचा समावेश नाही.

वरील तरतुदींचा विचार करून, न्यायालयाने असे नमूद केले आहे की, अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कथित गुन्ह्याचा खटला चालवला जाऊ शकत नाही. फिर्यादीनुसार, उपाध्याय हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या शेजाऱ्याशी झालेल्या वादाच्या कारणावरून वर्धा पोलिस ठाण्यात होते.

उपाध्याय यांनी शेजाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याचवेळी उपाध्याय यांच्याविरोधातही उलट तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी उपाध्याय हे त्यांच्या मोबाईलवरून पोलिस ठाण्यात सुरू असलेल्या चर्चेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. न्यायालयाने एफआयआर रद्द करून या प्रकरणात उपाध्याय यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

महत्वाच्या बातम्या
Gautami Patil : आपल्या घायाळ अदांनी महाराष्ट्राला वेड लावणारी लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या
Govardhan: गाईच्या शेनापासून बनवला ३५ फूटी श्रीकृष्ण; पाहण्यासाठी उसळली तुफान गर्दी
Trupti Desai : पुण्याचे राजकारणी इतके निर्लज्ज कसे झाले? विनायक निम्हणांच्या निधनाला २४ तासही झाले नाही तोच…
Bachchu Kadu : गुवाहटीतून मला परत यायचं होतं, पण तिथे आलेला माणूस परत…; बच्चू कडूंनी अखेर सोडलं मौन

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now