Share

VIDEO: तरुणाने छेड काढल्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने स्वत:च केला शेअर; पोलिस म्हणाले…

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडीओ टाकत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये माही विजचं देखील नाव येतं. तिची सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. सध्या ही अभिनेत्री चर्चेत येण्याचं कारण मात्र भयानक आहे. कारण ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल.

माहीची भररस्त्यात छेड काढण्यात आली, आणि तिला बलात्काराची देखील धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. माहीने संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या घटनेसंदर्भात माहीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. तिनं या घटनेचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

व्हिडिओ शेयर करताना माहीनं लिहिलं आहे की, त्या व्यक्तीनं माझ्या वाहनाला टक्कर दिली आहे. त्यानंतर त्यानं मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. माझ्याशी गैरवर्तन केले, आणि बलात्काराची धमकी दिली. त्यामुळे मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी त्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी.

माहीच्या या ट्विट नंतर मुंबई पोलिसांनी तिला उत्तर दिले आहे. त्यांनी तिला जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला सांगितली आहे. त्यावर माहीनं बलात्काराची धमकी देणाऱ्या आणि तिची छेड काढणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. चाहत्यांनी यावर काळजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री माही बद्दल अधिक माहिती म्हणजे, बिग बॉसच्या 16 व्या पर्वामध्ये माही विजनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्या बोल्डनेसनं तिनं चाहत्यांना घायाळ केलं होतं. तिचा प्रवास त्या रियॅलिटी शो मधून लवकर संपला होता. तरीही तिनं आपल्या वेगळ्या अदाकारीनं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं. सध्या तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे.

माहीचा जन्म 1 एप्रिल 1982 रोजी दिल्ली येथे झाला. आज, माहीने एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवला आहे. आज ती रॉयल लाईफस्टाइल जगत आहे. परंतु नेहमीच सर्वकाही इतकं चांगलं नव्हतं. मुंबईत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी माहीने अनेक संघर्ष केला आहे.

इतर बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now