Share

VIDEO: मलायका अरोराच्या एका किसने कागदावरचा मासा झाला जिवंत, अशी जादू तुम्ही कुठेही पाहिली नसेल

टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असलेल्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यामध्ये स्पर्धक अभिषेक आचार्य ने फिश मॅजिक करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. माश्याचे चित्र असणाऱ्या कागदावर मलायका अरोराने किस केला आणि तो कागद पाण्यात सोडताच त्याचा जिवंत मासा झाला.

अभिषेक आचार्य हा एक सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, तो या कार्यक्रमात त्याची जादूची कला दाखवण्यासाठी आलेला होता. त्याने पहिल्यांदा कागदावर माश्याचे चित्र काढले. त्या कागदाचा मलायका अरोराला किस घेण्यास सांगितला. नंतर तो कागद पाण्याने भरलेल्या ग्लास मध्ये सोडून त्याला आग देण्यात आली.

पुढच्या एका मिनिटात पाण्यात असणारा कागद गायब झाला आणि त्याच्या जागी लाल रंगाचा सुंदर जिवंत मासा पाण्यात दिसला. हे पाहून मलायका, करण जोहर आणि किरण खेर चकीत झाले. उपस्थित प्रेक्षकांना देखील हे दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

सोनी टीव्हीने यूट्यूबवर जुन्या शोच्या एपिसोडमधील हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे. या व्हिडिओचा एपिसोड 2015 मध्ये टीव्हीवर आला होता. हा थ्रोबॅक व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. एक मिनिट 50 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिल्लीचा रहिवासी अभिषेक आचार्य मंचावर येतो. तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जादू हा त्याचा छंद आहे.

स्टेज वरती येऊन सर्वांची अनुमती घेतो आणि आपला अभिनय दाखवू लागतो. तो मलायका अरोराकडे येतो. खिशातून माश्याचे चित्र असणारा छोटासा कागद काढतो आणि मलायकाला कागदाचा किस करण्यास सांगतो. मलायका त्याच्या विनंतीचा आदर ठेवून कागदाला किस करते.

पुढे अभिषेक मलायका कडून हा कागद घेतो आणि चुरघळतो. सर्वांना त्या चुरघळलेल्या कागदाकडे पाहण्यास सांगतो. त्यानंतर तो पाण्याने भरलेला एक पारदर्शी ग्लास आणतो. त्यामध्ये या चुरघळलेल्या कागदाला लायटरने आग लावून तो पाण्यात टाकतो. एका क्षणात कागदाचा मासा तयार होतो. पाण्यात दिसणारा लाल रंगांचा मासा पाहून सर्व चकीत होतात. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now