प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो जी पण भूमिका साकारतो ती तो पुर्ण मन लावून साकारतो. त्याने आतापर्यंत खुप कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण प्रत्येक चित्रपटात त्याने त्याची भूमिका खुप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.
विकीचा उरी हा चित्रपट प्रंचड गाजला होता. त्यामध्ये तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसून आला होता. आता तो एका ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याची घोषणा सुद्धा चित्रपटाच्या दिग्दर्शनकाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विकी कौशलची तख्त आणि द अमर अश्वत्थामा या ऐतिहासिक चित्रपटांसाठी निवड झाली होती. पण हे चित्रपट काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. पण आता त्याला पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.
विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पण विकीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुप्पी, मिमिसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर आता ते संभाजी महाराजांचा जीवनपट पदड्यावर आणणार आहे. हा एक खुप मोठा प्रकल्प असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजय हे करणार आहे.
लक्ष्मण उतेकर आणि दिनेश विजय हे गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचं लेखन पुर्ण झालं असून नाव अजून ठरलेलं नाही. हा चित्रपट चांगला बनवण्यासाठी दिनेश विजय यांनी मोठे बजेट सुद्धा मंजूर केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बागेश्वर धाम: माईंड रिडींग काय आहे? तुम्ही एखाद्याच्या मनातलं कसं ओळखू शकता? वाचा वैज्ञानीक ट्रिक
स्वतःच चूक करून ईशानने विराटवर काढला राग, बाद होताच भर मैदानात कोहलीला केली शिवीगाळ; पहा व्हिडिओ
हिटमॅन इज बॅक! रोहित शर्माने ३ वर्षांनंतर झळकावले वनडे शतक, किवी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या