बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफने (Vicky Kaushal and Katrina Kaif) आज उत्साहात होळीचा सण साजरा केला आहे. विकी-कतरिनाची लग्नानंतरची ही पहिली होळी असून दोघांनी आपल्या कुटुंबीयांसोबत होळीचा सण साजरा करताना दिसून आले. दोघांनीही सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले असून सध्या ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विकी आणि कतरिनाने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत विकी कौशलचे कुटुंबीय दिसून येत आहेत. फोटोत विकी सेल्फी घेत असून कतरिना त्याच्या मागे सासूबाईसोबत उभारलेली दिसत आहे. तसेच या फोटोत विकी कौशलचे वडिल शाम कौशल आणि भाऊ सनी कौशलसुद्धा पोझ देताना दिसून येत आहेत.
तसेच यावेळी सर्वांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून सर्वांच्या चेहऱ्यावर रंग लागलेले दिसून येत आहे. हे फोटो शेअर करत विकी-कतरिनाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांच्या या फोटोंना चाहते खूप पसंती देत असून त्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, विकी-कतरिना ९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सस फोर्ट बटवारा येथे शाही अंदाजात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
लग्नानंतर विकी-कतरिना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकले नाही. कारण लग्नानंतरच दोघेही लगेच आपापल्या कामात व्यग्र झाले. मात्र, या बिझी शेड्यूलमध्येही दोघांनी एकमेकांसाठी थोडा तरी वेळ काढत असतात. लग्नानंतर दोघांनी ‘ख्रिसमस’, ‘न्यू ईअर’, ‘लोहरी’ असे सण एकत्र साजरा करताना दिसून आले. तसेच व्हॅलेंटाईन-डेच्या दिवशीही दोघांनी एकत्र वेळ घालवला.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास कतरिना सध्या ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी तिने चित्रीकरणास सुरुवात केली आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
याशिवाय कतरिना ‘मेरी ख्रिसमस’, ‘फोन भूत’, ‘जी ले जरा’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे विकी ‘सैम बहादुर’, ‘गोविंदा मेरा नाम’, ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’, ‘तख्त’ आणि ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ यासारख्या चित्रपटात दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आई कुठे काय करते’फेम अरुंधतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला मुलीचा वाढदिवस; चाहते म्हणाले, वाह…
राखी सावंतचा ‘हा’ व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल
‘द कश्मीर फाइल्स’मुळे विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ दर्जाची सुरक्षा; CRPF कडून होणार रक्षण