Share

मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..

Lata Mangeshkar Health Condition Is Critical

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर असल्याचे (Lata Mangeshkar Health Condition Is Critical) वृत्त समोर येत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल आहेत. नुकतीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी दिली होती. मात्र, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एएनआयने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. यानुसार मुंबई ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितले की, ‘लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे’.

https://twitter.com/ANI/status/1489871187870060546?s=20&t=8kiEw7DUFTMDbwA5KFDQJg

 

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना निमोनियाचाही आजार झाला होता. त्या ९२ वर्षांच्या असल्याने त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रूग्णालयात दाखल आहेत. तर जवळपास १९ दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती नुकतीच काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते की, मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्याशी मी बोललो आहे आणि त्यांनी सांगितले की, ‘लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा होत आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आता व्हेटिंलेटर काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्याप त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार’.

 

दरम्यान, लता मंगेशकर या भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घकालीन करिअरमध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये जवळपास ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे.

संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी म्हणून लता मंगेशकर यांना ओळखले जाते. भारत सरकारने त्यांच्या कार्यासाठी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच पद्म भूषण, पद्म विभूषण आणि दादा साहेब फाळके पुरस्कार देऊनही त्यांचे सन्मान करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल, कारण वाचून धक्का बसेल
भयानक! हिजाब घातला म्हणून महाविद्यालयात प्रवेश नाकारला; विद्यार्थीनींची कोर्टात धाव
‘आपकी इज्जत एक बार गई तो गई, हम तो रोज रातको बेचतेही है, खतम ही नही होती’

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now