Share

Veer Sawarkar: वीर सावरकर बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे, पाठ्यक्रमातील धडा वाचून विद्यार्थी चक्रावले

veer Sawarkar

(Veer Sawarkar): स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी ७ एप्रिल १९११ रोजी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. नाशिक कट खटल्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेमुळे त्यांची रवानगी सेल्युलर जेलमध्ये झाली. तिथे त्यांना कठोर शिक्षा करण्यात आली आणि लाठी व फटके मारण्यात आले. त्यांना पुरेसे अन्न दिले गेले नाही. सावरकर ४ जुलै १९११ ते २१ मे १९२१ पर्यंत पोर्ट ब्लेअर तुरुंगात राहिले.

गेल्या आठवड्यात कर्नाटकातील शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला होता. त्यावर एका गटाने आक्षेप घेतला व दोन गटांत संघर्ष झाला होता. हा वाद संपला नसून आता यात आणखी भर झालेली दिसून येत आहे. तो म्हणजे कर्नाटकातील ८ वीच्या पाठ्यक्रमात वीर सावरकरांबद्दलचा एक धडा आहे.

त्यात लिहले आहे की, “वीर सावरकर सेल्युलर जेलमध्ये जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हा ते बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे.” यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहे. जिथे सावरकरांना बंद केले होते तिथे सूर्यप्रकाश येण्यासाठी कोणतीही खिडकी नव्हती, मात्र एक बुलबुल त्या खोलीत येत होतं. त्यानंतर सावरकर रोज या पक्ष्याच्या पंखांवर बसून मायदेशी भ्रमण करायला जात होते.

पाठ्यक्रमात याचा वापर एक वाक्प्रचार म्हणून केला आहे. हा एक साहित्यिक अलंकाराचा अंश आहे. हा पाठ आठवीच्या कन्नड़ भाषेच्या पुस्तकात आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरीकडे पाठ्यक्रम तयार करणाऱ्या लोकांकडून सांगण्यात येत आहे की, यावरून वाद घालणे चुकीचे आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

पाठयक्रमातील या ओळींबाबत सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरु आहे. काहींनी याला हास्यास्पद ओळी म्हणूनही संबोधले आहे. या ओळींवर आधी कोणीही आक्षेप घेतलेला नव्हता. मात्र आता सोशल मीडियावर हा मजकूर व्हायरल झाल्यापासून याबाबत कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटी (केटीबीएस)ला अनेक तोंडी तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

पाठयक्रमातील हा धडा बदलण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये कन्नड ही दुसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांना शिकवली जाते. या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाची जबाबदारी रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडे सोपवण्यात आली होती. संशोधनानंतर पाठ्यपुस्तकात या मजकुराचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
Shah Rukh: एकतर्फी प्रेमात शाहरूखने अंकिताला जिवंत जाळलं, संतप्त लोकांनी केली निदर्शने, वाचा काय घडलं?
Hardik Pandya: यावेळी हार्दिक पांड्याने वाचवलं, पुढच्या वेळी अशी चूक करू नकोस, चाहत्यांनी विराटला फटकारलं
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मुलगा १० व्या वर्षी बनला बिझनेसमन, वडील राज कुंद्रासोबत करणार ‘हे’ काम
पती पत्नीची कमाल; एकाचवेळी झाले MPSC उत्तीर्ण, दोघेही बनले क्लास वन ऑफिसर

इतर ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now