पनवेलच्या भाजपच्या उपमहापौरांना वंचित कार्यकर्त्यांनी हाॅटेलात घुसून चोपले; प्रकाश आंबेडकरांबद्दल नीच विधान महागात

दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याच्या तर अनेक बातम्या समोर येत असतात. पण पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना मारहाण केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुनाभट्टीमधल्या एका हॉटेलबाहेर जगदीश गायकवाड यांना मारहाण केली आहे. या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. एक महिन्यापूर्वी झालेल्या वादातून त्यांना आता मारहाण केल्याचे समोर आले आहे.

एक महिन्यापूर्वी जगदीश गायकवाड एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत होते. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शिवीगाळ केली होती. तेव्हापासून कार्यकर्ते जगदीश गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक झाले होते.

जगदीश यांची ऑडियो क्लीप खुप व्हायरल झाली होती. त्यामुळे कार्यकर्ते खुप संतापले होते. अशात जगदीश गायकवाड एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना हॉटेलच्या बाहेर काढून चोप दिला आहे. या संपुर्ण घटनाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे.

आता या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात चुनाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी जगदीश गायकवाड यांच्यावर इतरही आरोप केले आहे. त्यानंतर पोलिसांनी जगदीश गायकवाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक केली आहे.

दरम्यान, जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकरांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ खुप व्हायरल झाला होता. त्यानंतर कळंबोली परिसरात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. पण त्यानंतर लगेचच त्यांना जामीन मिळाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतापून त्यांना हॉटेलबाहेर चोप दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती दान करुनही निशाची शेवटची इच्छा अपूर्णच; वाचा नक्की काय घडलं होतं?
एक पाय निकामी तरी छोट्या मावळ्याने सर केला रायगड, ओमकारची जिद्द पाहून राज्यभरातून होतंय कौतूक
रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन