Share

vasant more : येत्या २ दिवसात वसंत मोरे मनसे सोडणार? आता पक्ष पदाधिकाऱ्यांनीच दिला ४८ तासांचा अल्टीमेटम

vasant more

vasant more talk about mns leader  | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. पण या भूमिकेबद्दल मनसेचे काही नेते नाराज असल्याचे म्हटले जात होते. मनसे नेते वसंत मोरे हेही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन नाराज असल्याचे म्हटले जात होते.

त्यानंतर आपण राज ठाकरेंवर नाराज नसल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा वसंत मोरेंच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आता ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार आणि वसंत मोरे यांची एका लग्नात भेट झाली होती. त्यामध्ये अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे शहरातील पक्षामधून मला डावललं जातंय. मला टार्गेट केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरी सुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं. पण भाषणासाठी वेळ दिला जात नाही, अशी नाराजी वसंत मोरे यांनी बोलून दाखवली आहे.

वसंत मोरे यांनी आपण राज ठाकरेंना यासर्व गोष्टी सांगितल्या असल्याचेही म्हटले आहे. वसंत मोरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करुनही मनसेने यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. वसंत मोरेंनी केलेल्या वक्तव्यावर पक्ष दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करेल, असे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

वसंत मोरे हे पक्ष बदनामीचे वक्तव्य करत आहे. त्यांच्या बाबतीत दोन दिवस विचार केला जाणार आहे, असे मनसेने ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. आज पुण्यात मनसे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. पण या बैठकीत वसंत मोरे उपस्थित नसल्याचे म्हटले आहे.

मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. पक्ष नेतृत्व व पक्षावर मी नाराज नाही. पण मला डावललं जात आहे. माझी कामे, सामान्य लोकांमध्ये असलेली माझी प्रसिद्धी या लोकांना बघवत नाहीये. राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे पुण्यात आले होते. तेव्हा ते नेत्यांना बोलतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. मी पक्षातून गेलो तर पक्षाला फरक पडेल, पण नेत्यांना आनंद होईल, असेही वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
sharad pawar : …नाहीतर मलाच बेळगावात जावं लागेल; शरद पवारांनी कर्नाटकला दिला ४८ तासांचा अल्टिमेटम
delhi : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणीने आखला भयानक प्लॅन, आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि…
Mehdi Hasan Miraz : विजयानंतर बांगलादेशच्या मेहदी मिराझला चढला घमंड; म्हणाला मला फक्त 20 चेंडू..

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now