vasant more share post on politics | गेल्या काही दिवसांपासून मनसेचा पक्षातील अंतर्गत वाद चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे नेते वसंत मोरे हे पक्षातील पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी एक फेसबूक पोस्टही लिहीली होती. त्यामध्येही त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.
अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र शेअर केले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीच्या प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्यांना झापलं होतं. ते अप्रत्यक्षपणे वसंत मोरेंसाठी होते, अशीही चर्चा होत होती. आता वसंत मोरे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे.
वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करत एक वेगळा इशारा दिला असल्याचीही चर्चा आहे. फेसबूक पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी असे म्हटले आहे की, राजकारणाचं काही खरं नाही, निवडणूका ही लोकं कधी घेतील माहिती नाही बाबा. जरा उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करतो. लग्नपार्टी, स्वागत समारंभ, वाढदिवस यांसाठी कृष्ण लीला गढी पुरंदर.
महापालिकेच्या निवडणूका लवकरच लागलीत असे म्हटले जात आहे. पण अजून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अशात वसंत मोरे हे पक्षातील नेत्यांवरही नाराज आहे. त्यामुळे आता ते सध्या व्यवसायाकडे लक्ष देत आहे. या पोस्टवरुन अनेक तर्कवितर्कही लावले जात आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. पण वसंत मोरे यांनी मशिदींवरील भोंग्यावर थोडी वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडून पुणे शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर ते पक्षाच्या कोणत्याच कमिटीच्या बैठकीत दिसून आले नाही.
अशात वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. आपल्या नाराजीसाठी शहरकार्यालय जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले होते. याची तक्रार त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे सुद्धा केली होती.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्याचा नाद खुळा! दूध विकण्यासाठी खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर, शेतात उभारले हेलिपॅड
gautami patil : कार्यक्रमावर बंदीच्या मागणीनंतर गौतमी भावूक; म्हणाली, माझी काळजी करणार कुणी आहे की नाही?
aditya thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर अखेर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले, त्यादिवशी मी…