मशिदींवरील भोंग्यावरून चांगलच राजकीय वातावरण तापले आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील मनसेप्रमुख राज ठाकरेंचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मनसैनिक आणि भाजप नेते राज याच्या भाषणाचे समर्थन करत असले तरी मोठ्या प्रमाणात इतर राजकीय पक्ष त्यांच्या भाषणावरुन टीका करत आहे.
तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज यांनी दिला होता. असे असले तरी काही मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला स्पष्ट नकार दिला आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला.
त्यानंतर पक्षाने मोरेंविरोधात मोठं पाऊल उचललं. मोरे यांना थेट पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर मोरे सातत्यानं राज यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. अखेर आज मोरे आणि राज ठाकरेंची भेट होणार आहे. त्यासाठी मोरे पुण्यातून मुंबईला रवाना झाले आहेत.
मोरे यांनी राज यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. “राज ठाकरेंनी मला मेसेज केला भेटायला ये. मी आज त्यांना भेटायला जात आहे. तसेच मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी राज ठाकरेंसोबत आणि पक्षासोबत आहे. मी माझं म्हणण मांडणार आहे,” असं वसंत मोरे यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना मोरे यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत भाष्य केले. ‘मी मनसेत आहे आणि मनसेतच राहणार, राज ठाकरे माझ्या मनात आहेत. आज भेटून मी माझी भूमिका मांडणार आहे. मोरे पक्ष सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. तसेच आज राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतात बघू, असेही मोरे म्हणाले.
तसेच ‘राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, असे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे. यामुळे आता मोरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून काय नेमके समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कौतुकास्पद! छोट्याशा हेअर सलूनपासून IPL पर्यंत केला खडतर प्रवास, कुलदीप सेनची अनटोल्ड स्टोरी वाचून व्हाल थक्क
PHOTO: कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीये अमरीश पुरी यांची मुलगी, दिसते खुपच सुंदर, करते ‘हे’ काम
काका-पुतण्यात खडाजंगी! मनसेचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान; ‘मातोश्रीत बसलेल्यांनी…’
तृप्ती देसाई भडकल्या; ‘परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु…’