गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे नेते राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी “जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांसोबत त्यांच्याच पक्षातील काही प्रमुख नेते ठाकरेंवर नाराज असल्याचे दिसून आले आहेत.
यामध्ये नगरसेवक आणि मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा देखील समावेश आहे. राज ठाकरेंच्या मेळाव्यातील वक्तव्यामुळे वसंत मोरे नाराज आहेत. याकारणाने ते लवकरच पक्ष सोडणार असल्याचे देखील म्हणले जात आहे. इतकेच नव्हे तर, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आता उधान आले आहे.
यासोबतच राज ठाकरे यांनीही वसंत मोरेंना मनधरणी करण्यासाठी बोलविले नसल्याची नुकतीच बातमी समोर आली आहे. ठाकरेंनी पुण्यातील नाराज मनसे पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी वागसकर, अनिल शिदोरे आणि साईनाथ बाबर यांना ‘शिवतीर्थ’वर पाचारण केले आहे. मात्र यात मोरेंना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्य म्हणजे, या तणावपूर्ण वातावरणात पक्षातील वाद विवादाला कंटाळून वसंत मोरेंनी पक्षाचा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप सोडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरेंकडून मनधरणी करण्यासाठी निमंत्रण न आल्यानंतर मोरेंनी पक्षाचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या सर्व घडोमोडींमध्ये मनसेने वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून काढून टाकल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे मनसेने घेतलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीने मोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. मात्र अद्याप यावर मोरेंनी कोणतेच उत्तर दिलेले नाही
गुढीपाडव्यादिवशी राज ठाकरेंनी घेतलेल्या मेळाव्यात “मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा” असा आदेश ठाकरेंनी नेत्यांना दिला होता. परंतु ठाकरेंच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे मोरेंनी म्हटले होते.
यामुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधताना, सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज असल्याचे वसंत मोरेंनी म्हणले होते.
महत्वाच्या बातम्या
दारूच्या दुकानाला थोर पुरुषांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देणे पडणार महागात; सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच पळ काढला
मंदानाने उघड केले मोठे रहस्य, म्हणाली, ‘माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते’
सोमय्यांची जेलवारी पक्की? INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस कारवाई करणार