अलीकडे मनसे नेते वसंत मोरे चांगलेच चर्चेत आले आहे. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत मांडलेलेल्या भूमिकेला वसंत मोरे कडाडून विरोध दर्शवला होता. त्यानंतर अजूनही शहर मनसेत धुसफूस सुरुच आहे. त्यानंतर माने हे नाराज असल्याच्या चर्चानी देखील जोर धरला होता.
अशातच मोरे यांची एक फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल होतं आहे. ‘गेल्या १५ वर्षांपासून माझ्या संपर्कात आहेत खुप गरीब रिटायर्ड माणूस आणि दुसरे आमचे शिंदेवाडीचे हवालदार जाधवसाहेब.. दोघांमध्ये वरवे या ठिकाणी जागेवरुन गेल्या २ वर्षांपासून प्रचंड वाद होता, अखेर तो मी मिटवला असल्याच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
https://www.facebook.com/100044231363898/posts/pfbid0sHqhVXQugYffAr9nSvu87gVVHjpMofJF5XLVeJK3mLyTfn4ZXciqMU81qbvgNuKHl/?d=n
वाचा काय म्हंटलं आहे वसंत मोर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये..
‘याला म्हणतात एक घाव आणि दोन तुकडे…’ या आहेत आमच्या कोंढवा रोडवरील माऊली नगरच्या बांगड्या वाल्या भाबी आणि हे त्यांचे पती गणीभाई आत्तार, गेल्या १५ वर्षांपासून माझ्या संपर्कात आहेत खुप गरीब रिटायर्ड माणूस आणि दुसरे जोडपे दिसतंय ते आमचे शिंदेवाडीचे हवालदार जाधवसाहेब.
दोघांमध्ये वरवे या ठिकाणी जागेवरुन गेल्या २ वर्षांपासून प्रचंड वाद मी ही अनेकदा फोन वरून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण काही झाले नाही, शेवटी परवा जागेवर गेलो सलग ३ तास जागेच्या मी स्वता मोजण्या केल्या आणि तोडगा निघाला…ज्यांच्या मध्ये प्रचंड वाद होता आज एकत्र आले आणि त्यासाठी मी निमित्त झालो खूप बरं वाटलं दोन कुटुंब एकत्र आली, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी आपल्याला डावलले जात असल्याची भावना व्यक्त करत नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभुमीवर आता राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे या दौऱ्यात वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्याचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे बोलले जातं आहे.
तर दुसरीकडे येत्या 21 मेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. राज यांची ही सभा मुठा नदीपात्रात होणार आहे. अलीकडे राज ठाकरे यांनी पुण्यात वाढवलेले लक्ष आणि होऊ घातलेली सभा यातून काय साधलं जाणार याकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला भलेमोठे खिंडार; हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा
VIDEO: अली मर्चंटसोबत डान्स करताना पुनम पांडेचा सरकला टॉप; संतापलेले युजर्स म्हणाले, ‘बेशरम’
३२ वर्षे शेकापचा गड असलेल्या अख्ख्या गावानेच केला शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या यामागचं खरं कारण…
संभाजीराजे शिवसेनेत करणार प्रवेश? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग