Share

वसंत मोरेंचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश? अजितदादांच्या ऑफरवर तात्या स्पष्टच बोलले, म्हणाले..

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक आणि प्रमुख चेहरा वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मनसे सोडून शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे. या अंतर्गत आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

अजित पवार आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नसोहळ्यात भेट झाली. त्यावेळी अजितदादांनी वसंत मोरे यांच्याशी हस्तांदोलन केले आणि ‘तात्या, कधी येताय राष्ट्रवादीत? वाट पाहतोय’ म्हणत वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

वसंत मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याची कबुली दिली. मात्र मी मनसे पक्ष सोडणार नाही, असे मोरे यांनी स्पष्ट केले. मात्र, पुण्यातील मनसे पक्षसंघटनेतील अंतर्गत गटबाजी लक्षात घेता वसंत मोरे यांचा हा निर्धार किती काळ टिकतो, हे पाहावे लागेल.

दरम्यान, या संदर्भात वसंत मोरे यांना विचारले असता त्यांनीही अजित पवार यांनी दिलेल्या ऑफरला दुजोरा दिला. राज्याचा एवढा मोठा नेता त्यांच्या पक्षात येणाचे निमंत्रण देतात, हा अजित पवार यांच्या मनाचा मोठेपणा आणि माझ्या कार्याची पावती आहे, असे मी मानतो. पण, पक्ष बदलण्याबाबत मी कोणताही विचार केलेला नाही, असंही वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.

पुणे महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मशिदीमध्ये हनुमान चालीसा वाचण्याचे आदेश दिले होते.

वसंत मोरे यांनी मात्र आपल्या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. माझ्या मतदारसंघातील मुस्लिम मतदार नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा कशी करणार, असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला.

वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे आणि पुण्यातील मनसे नेते नाराज झाले. पण, वसंत मोरे शेवटपर्यंत आपल्या आग्रहावर ठाम राहिले. त्यानंतर वसंत मोरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर वसंत मोरे यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now