राज्यात सध्या भोंग्यांच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी औरंगाबादमध्ये, ठाण्यात आणि गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. लवकरात लवकर हे भोंगे खाली उतरवा असे राज ठाकरेंनी म्हटले होते. (vasant more mahaaarti at katraj)
गुढीपाडव्यानिमित्त पहिल्यांदा ते मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अनेक मनसे नेत्यांनी नाराजी दाखवली होती. यामुळे तब्बल ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला होता.
तसेच मनसे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते मनसे सोडणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता? पण आपण मनसेतच राहणात असल्याचे वसंत मोरेंनी स्पष्ट केले होते. अशात हनुमान महाआरतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरच्या भागातील हनुमान मंदिरात वसंत मोरेंनी महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र या महाआरतीला राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही गैरहजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
पोलिस ठाण्यासमोर महाआरती करण्याचा मनसेने इशारा दिला होता. मात्र मोरे यांनी तसे केले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारीही वसंत मोरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच मनसेचे शहर प्रमुख व मोरेंचे मित्र साईनाथ बाबर हेही या आरतीला उपस्थित नव्हते.
राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. त्यामुळे ते वसंत मोरे यांच्या महाआरतीला उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरेंनी महाआरतीच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. तसेच शहरातील मनसेचे इतर पदाधिकारीही यावेळी हजर नव्हते.
वसंत मोरे यांनी महाआरतीनिमित्त शक्तिप्रदर्शन केल्याचे म्हटले जात आहे. यावेळी महाआरती करताना अनेक हिंदू मुस्लिम कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच आरती झाल्यानंतर वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेवरही भाष्य केले.
या आरतीला सर्वजण उपस्थित राहिले. मुस्लिम बांधवही या आरतीला उपस्थित होते. मी सुरुवातीपासून भूमिका मांडली होती. माझा राज साहेबांना किंवा पक्षाला विरोध नव्हता. तुम्हाला माहितीये तात्या जी भूमिका मांडतो ती योग्यच असते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची ताकद माझ्या आणि पक्षाच्या पाठीशी तशीच राहावी, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: तरुणाने छेड काढल्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने स्वत:च केला शेअर; पोलिस म्हणाले…
…म्हणून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडताय; संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आदेश; म्हणाले, ‘असा’ शहानपणा कोणी करु नये