Share

..तर कदाचीत ही आपली मराठी माणसांची संपत्ती मातीत मिळेल; वसंत मोरेंचे मदतीचे आवाहन

vasant more

एकेकाळी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक खंदा शिलेदार मनसेचा दबदबा राखून होता. ते होते राज ठाकरे ज्यांना आपला वाघ म्हणून उल्लेख करायचे असे सोनेरी आमदार रमेश वांजळे. मात्र दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. मनसेसह राजकीय वर्तुळात रमेश वांजळे यांच्या मृत्युनंतर पोकळी निर्माण झाली.

तसेच महाराष्ट्राचे खली म्हणून उमेश आसवे यांना संबोधले जाते. रमेश वांजळे यांचे अंगरक्षक म्हणून देखील उमेश यांनी काम केलं होतं. मात्र आता उमेश आसवे यांची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. खलीला प्रकृतीच्या देखील समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यासाठी उमेश यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

उमेश आसवे यांच्या मदतीला मनसे नेते वसंत मोरे हे धावून आले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट करत रमेश वांजळे यांचे बॉडीगार्ड असलेल्या उमेश यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदतीची याचना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

उमेश वसवे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर नाशिकमध्ये (Nashik) ऑपरेशन होणार आहे. तेव्हा याकामी त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी जनतेला हात जोडून आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे. मोरे यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

वाचा काय म्हंटलं आहे मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये.. महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची! हा आहे कै. सोनेरी आमदार रमेशभाऊंचा अंगरक्षक श्री. उमेश रमेश वसवे, सिंहगड वसवेवाडी. वय अवघे ४०. उंची तब्बल ७ फूट, वजन १६५ किलो, अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराने व्यापलंय, असे म्हणत मोरेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

‘मित्रांनो हा उमेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे. जर त्याने या महिन्यात त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित ही आपली मराठी माणसाची संपत्ती मातीत ही मिळेल, त्याचे नाशिकला ऑपरेशन करायचे आहे, उमेश ला जमेल तशी यथाशक्ती मदत करा,’ असं मोरे यांनी म्हंटलं आहे.

https://www.facebook.com/100044231363898/posts/pfbid02JTt6xLjcivt2JwhHQafgRXjLByGjmSujTU24n7cR4UvhZdon3icoTQUruYLhwZ7Ul/?d=n

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now